दत्तकला रेडिओ स्टेशनचे थाटात उद्घाटन
करमाळा : (कटुसत्य वृत्त):- शैक्षणिक प्रचार व प्रसार, कृषिविषयक स्थानिक संवाद, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि माहिती प्रचार यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दत्तकला इंजिनिअरिंग महाविद्यालयाने 'दत्तकला रेडिओ'ची सुरुवात केली आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सायन्स व टेक्नॉलॉजीचे डीन डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिवा माया झोळ, सीईओ डॉ. विशाल बाबर, प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, डॉ. उषादेवी पाटील आदी उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. झोळ यांच्या कल्पनेतून सुरू केलेल्या या रेडिओ स्टेशनचे प्रक्षेपण हे इंटरनेटद्वारे करण्यात आले आहे. सदरचे केंद्र २४ तास सुरू असून, जगामध्ये इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी हे केंद्र ऐकता येणार आहे.
हे केंद्र सुरू करण्यासाठी दत्तकला इंजिनिअरिंगच्या अकॅडमिक डीन प्रा. शीतल धायगुडे. समन्वयक प्रा. पल्लवी सूळ व कॉम्प्युटर विभागाचे प्रमुख डॉ. सचिन बेरे यांचा मोलाचा वाटा आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ संलग्नीकरण असलेल्या महाविद्यालयामधील हे पहिलेच केंद्र आहे. हा प्रकल्प स्थानिक जनतेच्या विकासास चालना देणारा ठरावा, अशी अपेक्षा यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा माया झोळ
यांनी व्यक्त केली.
0 Comments