महाराष्ट्रातील आरक्षणाचा तिढा सोडवण्याची ॲड. खरात यांची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकसभेच्या विशेष अधिवेशनात १८ ते २२ सप्टेंबरला महाराष्ट्रातील अनेक समाजाचा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी ५०% मर्यादा वाढवून ७०% करून सर्व समाजातील आर्थिक दुर्लभ व मागास झालेल्या समाजांना समान न्याय मिळण्यासाठी संविधानातील आरक्षणाची मर्यादा वाढविणारे विधेयक लोकसभेत मांडावे किंवा भारतातील सर्वच राज्यांना ७०% पर्यंत आरक्षण वाढविण्याची तरतूद करणारे विधेयक लोकसभेत मंजूर करावे म्हणजेच महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आरक्षणाला मे. सुप्रीम कोर्टामध्ये रद्द करण्याचा प्रश्नच राहणार नाही त्यामुळे मा. पंतप्रधानानां विनंती की वरीलप्रमाणे आरक्षणाच्या मर्यादेसंदर्भात विधेयक लोकसभेत मांडावे. जेणेकरून समाजा-समाजामध्ये वाढत चाललेली तेढ बंद होईल व एकोपा वाढेल. अशी मागणी फलटण मधील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना या निवेदनाद्वारे केली आहे.
0 Comments