Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सोलापूरच्या लेकीचा झेंडा

 लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सोलापूरच्या लेकीचा झेंडा



सोलापूर,(कटुसत्य वृत्त):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सोलापूरच्या वैष्णवी गायकवाड हिने मुलींमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.

वैष्णवी ही ऑर्किड कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. अभ्यासात सातत्य, कष्ट आणि परिश्रमामुळे तिने हा टप्पा पार केला.

वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नूमवि शाळेत, माध्यमिक शिक्षण दमाणी विद्या मंदिर येथे झाले आहे. अभियांत्रिकीत प्रथम वर्षी बाटू विद्यापीठामध्ये प्रथम आली होती. मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांची ती कन्या आहे.

तिच्या या यशाबद्दल विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments