Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रम्हदेव गायकवाड यांच्या कार्य पद्धतीवर कदम यांनी दिली शाबासकीची थाप

 ब्रम्हदेव गायकवाड यांच्या कार्य पद्धतीवर कदम यांनी दिली शाबासकीची थाप



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गृह राज्यमंत्री योगेश कदम बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते.या दौऱ्यावर असताना त्यांनी तुळजापूर आणि अक्कलकोट
येथे जाऊन देव दर्शन घेतले. यानंतर त्यांनी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय ,पोलिस आयुक्त कार्यालयास भेट देऊन विविध शासकीय कामांचा आढावा घेतला. यानंतर शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख ब्रम्हदेव गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते नवी पेठेत थाटात उद्घाटन करण्यात आले. कदम यांच्या स्वागतासाठी ब्रम्हदेव गायकवाड यांनी जोरदार तयारी केली होती.योगेश कदम यांचे नवी पेठेत आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना जिंदाबाद, एकनाथ भाई शिंदे आप आगे बढो हम आपके साथ है, योगेश दादा आप आगे बढो हम आपके साथ है,अश्या घोषणांनी नवी पेठेत वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले . उद्घाटन नंतर जोशी गल्ली येथे श्री इंद्रभवानी देवी माता मंदिर येथे दर्शन घेऊन त्या परिसरात शाखा उद्घाटन केले .यावेळी मंदिर समितीच्या वतीने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा सत्कार करण्यात आला.लाठी काठी चे प्रशिक्षक अश्विन कडलासकर यांचे व यांच्या विद्यार्थ्यांचे तसेच जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी दादासाहेब सरवदे यांना पोलिस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या शुभहस्ते शाल, पुष्पहार , पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
 पक्ष संघटन वाढीसाठी व येणाऱ्या काळात एकनाथ भाई शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना उपस्थित शिव सैनिकांना दिल्या. 

   यावेळी उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी  जिल्हाप्रमुख अमोल शिंदे , माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे , लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे , माझी परिवहन समिती सभापती तुकाराम मस्के , मंदिराचे पुजारी नागनाथ गायकवाड ,विनोद गायकवाड ,
शहर प्रमुख सचिन चव्हाण ,महिला शहर प्रमुख जयश्री पवार , सुनंदा साळुंखे , शिवानंद कट्टिमनी , उपजिल्हाप्रमुख सागर सोलापूरे, राजेंद्र कांबळे अक्षय बिद्री , सुजित खुर्द , सनी मौलवी, सचिन वाघमारे ,प्रशांत गायकवाड , सतीश चाकाई, प्रियंका परांडे , यांच्या सह शिव सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Reactions

Post a Comment

0 Comments