प्रभू येशू जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी ख्रिसमस फेस्टीव्हल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 12, 2025

प्रभू येशू जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी ख्रिसमस फेस्टीव्हल

 प्रभू येशू जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी ख्रिसमस फेस्टीव्हल




संगीत, नृत्य, नाटिकासह सांस्कृतिक मेजवानी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीने सर्वसमर्थ देव, सनातन पिता, कृपाळू व शांती अधिपती "प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव" साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सोलापुरातील वोरोनोको शाळा, रंगभवन जवळ येथे मंगळवार दि.१६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत ख्रिसमस फेस्टीव्हल (आनंद सोहळा) आयोजित करण्यात आला आहे. चर्च, शाळा, ख्रिस्ती संस्था सहभागी होणार आहेत, अशी रेव्हरंट सुभाष माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
        यंदाचे हे सोळावे वर्ष आहे. संगीत, नृत्य व नाटिका- सांस्कृतिक मेजवानी व संदेश आदी कार्यक्रम होणार आहेत. या ख्रिसमस फेस्टीव्हलमध्ये सोलापूरातील चर्चेस, सेवाभावी संस्था व शाळा गायन, नृत्य व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. यामध्ये ज्योती निकेतन संस्था, पहिली ख्रिस्ती मंडळी, हिंदूस्थानी कव्हनंट चर्च, मेथॉडीस्ट चर्च, गुड न्यूज चर्च, न्यू लाईफ फेलोशीप चर्च, पाईन ट्री चर्च, एपीफनी चर्च, रिव्हर ऑफ लाईफ चर्च, शिलोह चर्च, बिलीव्हर्स चर्च मोहोळ,  ई.टी.एफ.संस्था, वोरोनोको शाळा, पहिली ख्रिस्ती मंडळी-नवीन उपासना मंदिर, जीजस ख्राईस्ट गॉस्पेल सोसायटी चर्च, तारकाचे प्रार्थनागृह, बैरशेबा चर्च आदी चर्चेस, शाळा व ख्रिस्ती संस्था सहभागी होणार आहेत. प्रारंभी प्रार्थना व स्वागतगीत होईल.
         यावेळी विविध स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये धार्मिक पुस्तके, ख्रिससम डेकोरेशन, खाण्यांचे व कपड्यांचे विविध स्टॉल्स असणार आहेत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सर्व लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्यावतीने करण्यात आले.
          या पत्रकार परिषदेस रेव्ह. इम्मानुएल म्हेत्रे, ब्रदर सॅमसन बांभळ, पास्टर गिदोन अढागळे, पास्टर निरंजन उजागरे, पास्टर सालोमन सोनावणे, रेव्ह.सतीश गडकरी, पास्टर मनोज चांदणे, पास्टर संभाजी फाळके आदी उपस्थित होते.

सोलापूरच्या शांती, समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येणार

सोलापूरातील पाळकवर्गाच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. सांस्कृतिक कार्यक्रम दोन सत्रात होतील. पहिल्या सत्रानंतर बैरशेबा चर्चचे पाळक जॉन वेल्सलन हे पवित्र शास्त्रातून संदेश देतील. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरु होईल. शेवटी आभार प्रदर्शनासह संपूर्ण भारतासाठी, महाराष्ट्रासाठी व सोलापूरच्या शांती व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages