प्राचार्य बिडकरांचा रासकम संघटनेतर्फे भव्य सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर येथे नुकतेच प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारलेल्या मनोज बिडकर यांचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यस्थी संघटना (रासकम) सोलापूर जिल्हा शाखेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, संघटक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
प्राचार्य मनोज बिडकर यांचा सत्कार रासकम संघटनेचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नव्याने नियुक्त गटनिर्देशक तथा प्रभारी उपप्राचार्य झणझणे सर यांचाही रासकमचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण पुतळे व ज्येष्ठ मार्गदर्शक सटवाजी होटकर यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
सोलापूर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण लिपिक कर्मचारी संघटनेचे नव्याने निवडून आलेले पदाधिकारीदेखील या कार्यक्रमात विशेष सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये देवीदास गायकवाड अध्यक्ष (वरिष्ठ लिपिक), निरंजन खंदारे सरचिटणीस (कनिष्ठ लिपिक), संतोष गडगडे उपाध्यक्ष (कनिष्ठ लिपिक) या तीन पदाधिकाऱ्यांचा रासकमचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण पुतळे, राजाभाऊ सोनकांबळे, सौ. वैशाली जेधे आणि सटवाजी होटकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यस्थी संघटना जिल्हा शाखा सोलापूर आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण लिपिक कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य मनोज बिडकर व उपप्राचार्य झणझणे यांचा अधिकृत सत्कार पार पडला.
या कार्यक्रमाला कार्यालयीन अधीक्षक बी. बी. माळी, प्रमुख लिपिक अरुण घोणसे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार बी. एम. कोडगुळी, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार जी. व्ही. चव्हाण, वरिष्ठ लिपिक मनसूर शेख यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या मानाच्या सत्कार सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रासकम संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते सटवाजी होटकर यांनी केले. कार्यक्रमात सौहार्दपूर्ण वातावरणात नव्या प्राचार्यांच्या नेतृत्वाकडून संस्थेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
सोलापूरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यात नवा उत्साह, नव्या नेतृत्वातून कार्यसंस्कृती अधिक मजबूत होईल, असा आशावाद या सत्कार सोहळ्यातून व्यक्त झाला.
.png)
.png)
0 Comments