सोलापूर जिल्हा परिषदेतील १२९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेतील १२९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात ७० विनंती, ५४ प्रशासकीय तर ५ आपसी बदल्यांचा समावेश आहे. शुक्रवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले. त्यानंतर आता तीन दिवस प्रशासनाला सुट्टी असल्याने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मंगळवारीच नवीन ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेकडून अनुकंपा भरती प्रक्रिया सुरू आहे. अनुकंपाधारकांना त्यांच्या शैक्षणिक आतिनुसार पद उपलब्ध व्हावे, यासाठी बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने बदली प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, प्राथमिक शिक्षण, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, कृषी, बांधकाम क्रमांक १, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन विभागाचा समावेश आहे.
प्रशासन विभागातील ५०, आरोग्य २०, ग्रामपंचायत २५, महिला व बालकल्याण ५. प्राथमिक शिक्षण १, वित्त विभाग ४. कृषी विभाग २, बांधकाम क्र. १-९, ग्रामीण पाणीपुरवठा २, पशुसंवर्धन ११ अशा एकूण १२९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ नवीन ठिकाणी रूजू व्हावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, आता तीन दिवस सुट्ट्या आल्याने मंगळवारीच या कर्मचाऱ्यांना रुजू व्हावे लागणार आहे.
0 Comments