सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिना
निमित्त शेतकरी आणि उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा आज होणार गौरव..!
रुरल फाउंडेशनचा अनोखा उपक्रम...!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या पंधरा वर्षापासून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांची प्रेरणा घेऊन पुळुजच्या मातीत रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन चं रोपट लावलं. आणि त्याच्याच माध्यमातून विविध विधायक उपक्रम करत असताना दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी या फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी, उत्कृष्ट अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना डॉ. सुनील गावडे म्हणाले, शेतकरी आणि वारकरी यांच्या विचाराचा वारसा घेऊन गेल्या पंधरा वर्षापासून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलं असून जलयुक्त शिवार योजनेमध्ये सुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलला आहे.त्याचबरोबर समाजातील गरजू आणि आर्थिक दृष्ट्या नाजूक परिस्थिती असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना आज पर्यंत शैक्षणिक मदत देण्याचा वारसा सुद्धा या फाउंडेशनने जपलेला आहे. "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले, देव तेथेचि जाणावा, तोचि साधू ओळखावा. "या संत तुकारामांच्या विचाराचा आदर्श घेऊन समाजातील अनेक निराधार आणि गरीब नागरिकांना अन्नदान करण्याचं काम रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. 2020-21 मध्ये जागतिक महामारी म्हणून कोरोनाने सगळ्या जगाला वेठीस धरलं. अशा काळात सुद्धा माणूस हीच एक जात आणि मानवता हाच एक धर्म हा विचार घेऊन रुरल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजूंना रुग्णवाहिका देण्याचं काम केलं.
गेल्या पंधरा वर्षापासून रुरल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक विधायक आणि समाज उपयोगी उपक्रम राबवल्या असून यापुढेही हा वारसा आम्ही पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांची प्रेरणा घेऊन चालू ठेवू अशी ग्वाही यावेळी डॉक्टर सुनील गावडे यांनी दिली. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये होणाऱ्या गौरव सोहळ्यासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत.
या कार्यक्रमासाठी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आ. रणजीत सिंह मोहिते पाटील, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. गोपीचंद पडळकर आ. प्रणिती शिंदे आ. समाधान आवताडे आ. राजाभाऊ राऊत, आ. राम सातपुते माजी आमदार नारायण पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, माजी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, शिवसेना शहराध्यक्ष मनोज शेजवाल, मोहोळ तालुक्याचे भाजपा नेते संजय क्षीरसागर, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक अण्णासाहेब देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या गौरव सोहळ्यामध्ये आ. अभिमन्यू पवार, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंगेश चिवटे, दिलीप धोत्रे, विनोद महाडिक, डॉ. प्रसन्न कासेगांवकर , डॉ. सुनील कारंडे, प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा माने, प्रांत अधिकारी गजानन गुरव, कृषी अधिकारी दत्तात्रय गाव साने, ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे, प्रवीण सिंग परदेशी, मिलिंद शंभरकर ,दिलीप स्वामी, सुरेश सोडळ, तुषार ठोंबरे, संदीप कोहिनकर, हिम्मत जाधव, सदाशिव पडदुणे सैफन नदाफ ,संतोष जाधव, कुंदन भोळे, नितीन तारळकर, माऊली हळनवार, दयासागर दामा, सीमाताई घाडगे, बाळासाहेब झांबरे पाटील, स्वातीताई शेंडगे, कुंडलिक गोडसे, शशिकांत पुदे, प्रशांत काळे, स्वाती गवळी, संजय पाटील ,संजय देशपांडे, डॉ शीतल बागल, बाळासाहेब काळे, डॉ शंकर टेंगले समीर मुजावर, औसेकर बाळू, बालाजी कदम, दत्तात्रय कोरे, संध्या खांडेकर, विजय इमडे ,श्रीमंत झाकणे, आणि छाया खरात आदींचा या गौरव सोहळ्यामध्ये सत्कारमूर्ती म्हणून समावेश करण्यात आला असल्याची माहिती यावेळी डॉ. सुनील गावडे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शितल तेली- उगले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याचं शेवटी बोलताना डॉक्टर गावडे यांनी सांगितलं.
0 Comments