Hot Posts

6/recent/ticker-posts

तिरुपती ब्रह्मोत्सवम् मध्ये माहेरची साडी अर्पण करण्यासाठी सोलापुरातून पद्मशाली समाज बांधव होणार सहभागी..!

 तिरुपती ब्रह्मोत्सवम् मध्ये माहेरची साडी अर्पण करण्यासाठी सोलापुरातून

 पद्मशाली समाज बांधव होणार सहभागी..!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महालक्ष्मी स्वरूपिणी पद्मावती देवीस माहेरची साडी चोळी ओटी भरण्याचा मान ब्रह्मोत्सवामध्ये सोलापूर पद्मशाली समाज बांधवांना मिळावा यासाठीच सोलापूर पद्मशाली न्याती संस्थेच्या वतीने पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सव संस्था स्थापन करण्यात आली असून  यंदाच्या वर्षी सोलापूर येथील पद्मशाली बांधवास ब्रह्मोत्सवामध्ये पद्मावती देवी माहेरची साडी चोळी आणि ओटी भरण अर्पण करण्याची विनंती केली. आणि त्या विनंतीला मान देऊन तिरुपती येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिनांक 21 नोव्हेंबर 2023 हा दिवस सोलापूर पद्मशाली समाजास माहेरची साडी देण्यासाठी राखीव ठेवला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक  माजी महापौर जनार्धन कारमपुरी अध्यक्ष गणेश पेनगोंडा आणि सचिव व्यंकटेश पडाल यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना गणेश पेनगोंडा म्हणाले, तिरुपती व्यंकटेश्वर पत्नी महालक्ष्मी स्वरूपिणी देवी पद्मावती अम्मा वारू या स्वतः " मी पद्मशाली" असा गर्भ गृहातून आवाज देऊन पुरातन काळापासून साडी चोळी , ओटी भरण्याचा पद्मशाली वंशियाचा बहुमान कायम ठेवला. तशी नोंद ताम्रपटात असून तो ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानाकडे उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. या ब्रह्मोत्सवम् समितीतील पद्मशाली नाती संस्थेचे माजी अध्यक्ष आणि माजी महापौर जनार्दन कारमपुरी, अध्यक्ष गणेश पेनगोंडा यांनी तिरुपती येथील पद्मावती देवी देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी सी. गोविंद राजन् यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली होती. देवी साडी चोळी व ओटी भरण्यासाठी जोडप्यांना मान मिळाला असून ब्रह्मोत्सव मध्ये भाग घेण्यासाठी पद्मशाली समाज बांधवांना सौभाग्य लाभलेले समाज बांधव दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री तिरुपतीस  होणार आहेत. यंदाच्या वर्षी पद्मावती देवी देवस्थान ने 19 नोव्हेंबर 2023 हा शुभ दिवस सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांसाठी निश्चित केल्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. तरी पद्मावती देवी साडीचोळी अर्पण करण्याचा बहुमान व सौभाग्य प्राप्तीसाठी पद्मशाली बांधवांनी प्रति जोडपी 15001/- रुपये रक्कम समितीचे अध्यक्ष गणेश पेनगोंडा खजिनदार श्रीधर सुरा कार्य सदस्य नागेश सरगम यांच्याशी संपर्क साधून 21 सप्टेंबर 2023 पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन माजी महापौर तथा संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपुरी अध्यक्ष गणेश पेनगोंडा आणि सचिव वेंकटेश पडाल यांनी केले आहे. यापुढेही संस्थेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येणार असून नवरात्रीच्या काळात शतशंडीयाग व दुर्गा सप्तशतीचा पाठ कार्यक्रम करण्याचा संकल्प असल्याचे समितीने जाहीर केलं आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments