Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षक दिनानिमित्त बार्शी तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने 80 पेक्षा अधिक वय असणाऱ्या शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार समारंभ सोहळा संपन्न.

 शिक्षक दिनानिमित्त बार्शी तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक

 संघटनेच्या वतीने 80 पेक्षा अधिक वय असणाऱ्या शिक्षकांचा शाल श्रीफळ

 पुष्पगुच्छ देऊन सत्कार समारंभ सोहळा संपन्न.


वैराग (कटूसत्य वृत्त ):-बार्शी तालुका सेवा निवृत्त संघटनेच्या वतीने वैराग येथील माजी मंत्री कैलासवासी शहाजीराव पाटील सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम तुळशीदास जाधव प्रशाला सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीमान हरिश्चंद्र भोसले सर यांच्या हस्ते डॉक्टर राधाकृष्ण व आचार्य दादासाहेब दोंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आला

त्यानंतर बार्शी तालुका सेवा निवृत्त संघटनेच्या वतीने बार्शी तालुका पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री महाजन साहेब व चित्रा मॅडम यांच्या निधनामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी बार्शी तालुका सेवानिवृत्त संघटनेतील 80 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे अभिमन्यू दादाराव नागटिळक, निवृत्ती पाखरे, गुरुलिंग बोबडे, अर्जुन हगवणे, सौदागर क्षीरसागर,सुधाकर डोळे, चंद्रभान डमरे,भालचंद्र जाधवर ,बिभीषण काटमोरे, सरफुद्दीन शेख, दगडू भराडे,मारुती माळी, हरिचंद्र वाघ, अनंत सानप, दिगंबर वायकर, प्रभुलिंग पाचभाई यांच्या सह ३० ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचा बार्शी तालुका सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर खरटमोल सचिव सनातन पाटील मार्गदर्शक पंडितराव काशीद व श्रीमती अंधारे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

 तसेच शिक्षक संघाचे नेते बब्रुवान काशीद, मुरलीधर खरटमोल, पंडितराव काशीद,भाकरे गुरुजी, रोहीदास अडसूळ सह प्रमुख पाहुणे हरिचंद्र भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले हरिचंद्र भोसले सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शिक्षक दिनानिमित्त बार्शी तालुका सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने माझ्या सत्कार सन्मान केला खरच आज मी भाग्यवान आहे की जेष्ठ आणि श्रेष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांकडून माझा सन्मान होत आहे मी त्यांचा ऋणी आहे अशा परखड शब्दात त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे व सभासदचे आभार मानले

यावेळी बार्शी तालुका सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव  सनातन पाटील यांनी दिनांक 8/7/2023 रोजी बार्शी येथे संपन्न झालेल्या सभेचा इति वृत्तांत वाचून दाखविला व त्यास सर्वानुमते मंजुरी घेण्यात आली 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाच्या वेळी पंडितराव काशीद गुरूजी, रामभाऊ दहीटणकर गुरुजी,बिबिशन चव्हाण गुरुजी, नंदकुमार हेग्गे गुरुजी, दिगंबर वायकर गुरुजी, तुकाराम मुळे गुरूजी, सुभाष जांभळे गुरूजी,अंधारे मॅडम,कोरे मॅडम, काटमोरे मॅडम,आदी सहकार्यानी भोजनाची व्यवस्था केली होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग डमरे,अगंद गवळी, श्रीहरी गायकवाड, दिलीप डमरे आदींनी परिश्रम घेतले 

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्ती पाखरे गुरुजी होते तर सूत्रसंचालन केंद्रप्रमुख प्रकाश नलवडे यांनी केले आणि उपस्थित जेष्ठ आणि श्रेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक व मान्यवराचे सचिव सनातन पाटील यांनी आभार मानले

Reactions

Post a Comment

0 Comments