सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक श्री गणेशाची प्रतिष्ठापना करावी- आयुक्त शीतल तेली-उगले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्रीगणेश उत्सवानिमित्त उपायोजना करण्यासंदर्भात आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ,उपायुक्त मच्छिंद्र घोलप, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड, सर्व विभागीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध उपाय योजना करण्याबाबत आज चर्चा करण्यात आली. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांचे खड्ड्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्या कापणे, मार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती, विहिरीमधील तसेच विसर्जन कुंड येथील गाळ काढणे, मूर्ती संकलन केंद्र आदि संदर्भात आज आढावा घेण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांना महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी आवश्यक ते सूचना दिल्या. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची मोफत कार्यशाळा आयोजन करण्यात आले असून
या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे तसेच यावर्षी गणेशोत्सवामध्ये सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक श्री गणेशाची प्रतिष्ठापना करावे असे आवाहन आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली.
0 Comments