Hot Posts

6/recent/ticker-posts

आ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी एमआयडीसी मध्ये रक्तदान शिबिर १५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 आ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी एमआयडीसी मध्ये रक्तदान

 शिबिर १५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान 


नेत्र रुग्णालयासाठी ढेकणे परिवाराच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश
 सुपूर्त



टेंभुर्णी  (कटूसत्य वृत्त):- इंडस्ट्रियल असोसिएशन टेंभुर्णी यांच्या वतीने माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त एम आय डी सी टेंभुर्णी येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी यशवंत शिंदे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडू नाना ढवळे, उद्योजक बाळासाहेब ढेकणे, औद्योगिक प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे, यशोदीप कॅम्पुटर चे संस्थापक अध्यक्ष गोरख खटके सर, नागनाथ पाटील, विजय ढेकणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

टेंभुर्णी इंडस्ट्रियल असोसिएशन नेहमीच समाजउपयोगी उपक्रम घेत असते, रुक्षारोपण, कोरोना काळात रुग्णासाठी मदत, कोरोणा काळात शहीद दिनानिमित्त ७५५ रक्त बाटल्या,महापुरुषांच्या जयंत्या असे विविध उपक्रम राबविले बद्दल असोसिएशनचे अध्यक्ष राजाभाऊ ढेकणे व त्यांच्या सर्व स्टीमचे आ बबनराव शिंदे यांनी कवतुक केले. व असोसिएशन च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

असोसिएशनचे अध्यक्ष राजाभाऊ ढेकणे यांनी आपल्या प्रास्ताविकात एम आय डी सी मध्ये केलेल्या कामाचे व विविध समाज उपयोगी उपक्रमाचा लेखाजोखा मांडला.

एम आय डी सी मध्ये पोलीस चौकी, अग्निशामक दल, इंडस्ट्रियल असोसिएशनसाठी स्वतंत्र जागा अशा मागण्या इंडस्ट्रियल असोसिएशनचे संस्थापक अमोल जगदाळे यांनी केल्या.यावेळी बंडू नाना ढवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी १५५ रक्त बाटल्यांचे संकलन झाले, रमाबाई शहा रक्तपेढी बार्शी यांनी रक्त संकलनाचे काम केले.

यावेळी इंडस्ट्रियल असोसिएशनचे संस्थापक अमोल जगदाळे, अध्यक्ष राजाभाऊ ढेकणे, उपाध्यक्ष राजाराम येवले, सदस्य अमित पुरवत, आयुब पटेल, विक्रम भोसले, संदीप जाधव, किशोर तळेकर, संतोष पलांडे, किरण पराडे, प्रकाश देशमुख, असोसिएशनचे सर्व सदस्य, कामगार उपस्थित होते.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विनोद गायकवाड, सचिन ढेकणे, महावीर करंडे, अमोल कदम,रवी सोमसोळे, प्रणव चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील व विलास दोलतोडे यांनी तर आभार असोसिएशनचे उपाध्यक्ष राजाराम येवले यांनी मानले.


*नेत्र रुग्णालयासाठी ढेकणे परिवाराच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश*
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता दृष्टी हिन लोकांना दृष्टी देण्यासाठी माढा येथे नेत्र रुग्णालय उभारण्याचा आ बबनराव शिंदे यांनी मानस केला. याचे सर्व स्तरातून कवतुक होत आहे. चांगल्या कामाला नेहमीच टेंभुर्णी एम आय डी सी इंडस्ट्रियल असोसिएशन योगदान देत असते. यावेळी नेत्र रुग्णालयासाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश ढेकणे इंडस्ट्रिजच्या वतीने उद्योजक बाळासाहेब ढेकणे, अध्यक्ष राजाभाऊ ढेकणे व विजय ढेकणे यांनी आ शिंदे यांचे कडे सुपूर्त केला.
Reactions

Post a Comment

0 Comments