Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळच्या मुकबधिर विद्यार्थ्यांनी तयार केल्या राख्या

 मोहोळच्या मुकबधिर विद्यार्थ्यांनी तयार केल्या राख्या


 कुरुल (कटूसत्य वृत्त):-प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट मोहोळ संचलित मूकबधिर निवासी शाळा मोहोळ ता मोहोळ या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने रक्षाबंधन या पवित्र सणाचे औचित्य साधून स्वतःच्या हाताने सुंदर रंगबेरंगी राख्या तयार केल्या असून त्या राख्या विक्रीसाठी अल्प दरात मोहोळ शहरात उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे समाजात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 मोहोळ तालुक्यासह पंढरपूर, माढा, सांगोला, उत्तर सोलापूर, बार्शी तालुक्यातील विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. त्यांनी तयार केलेल्या राख्या अत्यंत सुरेख असून आत्मनिर्भर बनून स्वयंपूर्णतेकडे त्यांची वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.

यावेळी प्रभात चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार पाटील बोलताना म्हणाले की या विशेष मुलांमध्ये कोणते ना कोणते कलागुण दडलेले असतात, या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून हि मुले पुढे आपल्या पायावर उभी राहून भविष्यात स्वावलंबी बनण्यास मदत होईल. त्यामुळे तत्यांना आपल्या कुटुंबावर निर्भर राहण्याची गरज पडणार नाही.

 यावेळी मुख्याध्यापक वैभव शेटे, अजिंक्य वीर, रामचंद्र देशमुख, आण्णाराव शिंदे, समाधान सरवदे, नंदकुमार बंडगर, संभाजी मोरे, वैशाली गाटे, गौरी साठे, अंजली हरिदास आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments