माढा रेल्वे स्थानक हिरवा झेंडा
माढा (कटूसत्य वृत्त):-माढा लोकसभा मतदार संघाच्या चौफेर विकासाचे व्हीजन घेऊनच मी काम करीत असुन कोरोनाच्या कालावधीत तिन वर्ष खासदार फंड मिळाला नाही.त्याचा अनुशेष काढला जात आहे.नोव्हेंबर महिन्यापर्यंत माढा रेल्वेस्थानकावर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा देणार असल्याचे माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
माढा रेल्वेस्थानकावर सिध्देश्वर एक्सप्रेसला मिळालेल्या थांब्यानिमित्त हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात खासदार निंबाळकर बोलत होते.
सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसला माढयात थांबा मिळाला आहे. रविवारी ( ता. २७) रात्री साडेअकरा वाजता खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार नाईक - निंबाळकर म्हणाले की उजनी धरण माढा तालुक्यात आहे. त्यामुळे माढा तालुका जिल्हयाचे रक्षण करणारा तालुका आहे. त्यामुळे माढयाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे.
यावेळी आमदार बबनराव शिंदे म्हणाले की माढा परिसरातील २५ -३० गावातील लोक, विदयार्थी, नोकरदार , व्यापारी यांची मागणी हुतात्मा एक्स्प्रेस व इंद्रायणी एक्सप्रेसला माढयात थांबा मिळण्याची मागणी करत आहेत. ती मागणी खासदारांनी पूर्ण करावी.यावेळी शेकडो लोकांनी हुतात्मा एक्स्प्रेसला थांबा मिळावा म्हणून खासदारांना निवेदन दिले.या कार्यक्रमास माढ्याचे आमदार बबनराव शिंदे,राजाभाऊ चवरे,झुंजार भांगे, भाजपा तालुकाअध्यक्ष योगेश बोबडे,योगेश पाटील,गणेश चिवटे,उमेश पाटील,शंभु साठे यांच्यासह रेल्वे अधिकारी,भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments