Hot Posts

6/recent/ticker-posts

शासन आपल्या दारी उपक्रम.... एक ही पात्र लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये ---जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

 शासन आपल्या दारी उपक्रम....

एक ही पात्र लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये     ---जिल्हाधिकारी कुमारशीर्वाद

 

*पंढरपूर येथे 10 सप्टेंबर रोजी कोर्टी-वखारी रस्ता गट क्रमांक 24 येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन


*या कार्यक्रमासाठी 30 ते 35 हजार लाभार्थी जिल्ह्याच्या विविध भागातून उपस्थित राहणार


*कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध शासकीय विभागाच्या योजनांची माहिती देणारे 50 स्टॉल लावण्यात येणार




 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी पंढरपूर येथे होत आहे. आपल्या जिल्ह्याला 75 हजार शासकीय योजनांचे लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. तरी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध शासकीय योजनांच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

                जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवारउपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमलेसार्वजनिक बांधकाम विभागाचे पंढरपूरचे कार्यकारी अभियंता अमित निमकरसहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे प्रांताधिकारी गजानन गुरवजिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका आशिष लोकरे व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

               जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले कीशासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्याला बारा हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. सर्व संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी निवडलेल्या लाभार्थ्यांचे संपूर्ण नाव पत्ता व मोबाईल क्रमांकासह यादी विहित प्रपत्रात भरून प्रशासनाला सादर करावी. दिनांक 1 एप्रिल 2023 पासून शासकीय योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची नावे पाठवावीत. आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन सर्वेक्षण केलेले व योजनेसाठी पात्र असलेला एकही लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेअसे त्यांनी सांगितले.

               जिल्ह्याच्या अकरा तालुक्यातील विविध गावांमधून पंढरपूर येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जवळपास 30 ते 35 हजार लाभार्थी येण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर येथील कोर्टी- वखारी रस्तागट क्रमांक 24 येथे हा कार्यक्रम होणार असून यासाठी जलरोधक मंडपबॅरेकेटींग व अन्य कामकाज तात्काळ सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. त्याप्रमाणेच प्रत्येक गावातून लाभार्थी कार्यक्रम ठिकाणी आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे आवश्यक असलेल्या बसेसचा पुरवठा करण्याची मागणी केली असून त्यानुसार सोलापूर व अन्य जिल्ह्यातून महामंडळाकडून बसेस उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

                ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय विभाग  प्रमुखावर देण्यात आलेली जबाबदारीचे आदेश प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेले आहेतत्यानुसार प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावीअसे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले.

                कार्यकारी अभियंता अमित निमकर यांनी या कार्यक्रमासाठी तयार करण्यात येत असलेलेजलरोधक मंडप,व्यासपीठपार्किंग व्यवस्थालाभार्थ्यांची बैठक व्यवस्थाशासकीय विभागासाठी 50 स्टॉल या अनुषंगाने बैठकीत माहिती दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments