Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी व मित्र पक्षांची मुंबईत संयुक्त बैठक

 भाजपाशिवसेना,राष्ट्रवादी व मित्र पक्षांची मुंबईत संयुक्त बैठक

महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आ. प्रसाद लाड यांची माहिती 



 

मुंबई (कटूसत्य वृत्त):-भारतीय जनता पार्टी शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंतभाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघप्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येमाध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या या आढावा बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.

        भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेकेंद्रीय मंत्री रामदास आठवलेराष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरेशिवसेना नेते रामदास कदमखा. गजानन कीर्तिकरजोगेंद्र कवाडेआ. विनय कोरेआ. महादेव जानकर,आ. बच्चू कडूआ. हितेंद्र ठाकूर आणि सदाभाऊ खोत हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री,भाजपशिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदारआमदारजिल्हाध्यक्षसंपर्क प्रमुख उपस्थित राहणार आहेत असेही आ. लाड यांनी सांगितले. ३१ ऑगस्ट रोजी रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे.१ सप्टेंबर रोजी वरळी येथे विभागनिहाय आढावा बैठका होणार आहेत असेही आ. लाड यांनी नमूद केले.

 

Reactions

Post a Comment

0 Comments