चिंतामणी विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी पाठविल्या सीमेवरील जवानांसाठी राख्या
थेऊर (कटूसत्य वृत्त):-छत्तीसगड व जम्मू काश्मीर या भागातील सीमेवर जागता पहारा देत देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांना हवेली तालुक्यातील चिंतामणी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय थेऊर येथील विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या जवळ जवळ सहाशे राख्या आणि शुभेच्छा कार्ड पाठवल्या आहेत ." देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या या जवानांना या विद्यार्थिनींनी आगळीवेगळी भेट दिली आहे "
सैनिक बांधव उन , वारा , पाऊस , थंडी , बर्फ , डोगर दऱ्या कड्या कपारीत अशा अत्यंत अनुकुल परिस्थितीत चोवीस तास खडा पहारा देतात म्हणुणच देशातील सर्व सामान्य नागरिक सुरक्षित आहेत . सैनिक बांधवन विषयी आदराची भावना निर्माण करण्यासाठी दर वर्षी प्रमाणे या हि वर्षी *एक राखी सैनिक बांधवान साठी* हा उपक्रम विदयालयात राबिविण्यात आला
चिंतामणी विद्यालयाचे प्राचार्य बि. डि. नेवाळे विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर खरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यातील पाचवी ते बारावीतील विद्यार्थिनींनी विद्यालयातच सहाशे राख्या आणि शुभेच्छा कार्ड तयार करण्यात आले. त्या राख्या व शुभेच्छा कार्ड जमा करुन चिंतामणी विद्यालयाच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी सहाशे राख्या तयार करून पाठवण्यात आल्या आहे.
तसेच या वेळी चिंतामणी विद्यालयाच्या सौ रोटे मॅडम , सौ कंद मॅडम , सौ नजर मॅडम , सौ कानकाटे मॅडम , सौ तनुजा सूर्यवंशी मॅडम , सौ वाघ मॅडम , यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले या वेळी शिक्षक , शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला या प्रंसगी केअर हॉस्पिटल च्या डॉ. शितल मिसाळ यांनी समन्वय म्हणून काम पाहिले
0 Comments