काॅग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे- माढ्याचे भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वक्तव्य
माढा (कटूसत्य वृत्त):-सत्तेच्या विरोधात काॅग्रेसचे आमदार खासदार राहूच शकत नाहीत.आमदार खासदारां मध्ये मोठी अस्वस्थता असुन मला खासगी मध्ये बोलावून दाखवली आहे.त्यामुळे या अस्वस्थतेतुनच काॅग्रेस पक्ष फुटणार असुन सध्या काॅग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे असे वक्तव्य माढ्याचे भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केेेेले.
माढ्यातील रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसला थांबा देण्याचा शुभारंभ रविवारी सायंकाळी पार पडला.त्यानंतर खासदार निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे,राजाभाऊ चवरे, भाजपा तालुकाअध्यक्ष योगेश बोबडे,योगेश पाटील,गणेश चिवटे,उमेश पाटील,शंभु साठे आदी उपस्थित होते. खा.निंबाळकर पुढे बोलताना म्हणाले,पवार कुटूंब एकत्र राहणे गरजेचे असुन अजित पवारांसह अन्य आमदार सहकारी भाजपकडे गेले आहेत.राष्ट्रवादी पक्षातले वाद मिटवुन शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजप पक्षात आल्यास देशाचे राज्याचे कल्याणच होईल शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी चे हात बळकट होतील.भाजपात शरद पवार आल्यास त्यांचा आम्हांला आनंदच होईल.भाजप पक्षाने शरद पवारांना पक्षात येण्यासाठी कोणती ऑफर दिली आहे का ? यावर याची मला तरी कल्पना नाही.पण अशी ऑफर देण्याची शक्यता फारच कमी आहे.येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला ५० जागा नक्कीच वाढलेल्या दिसतील.पुढची १० वर्ष राज्यात व क्रेदात कायम राहील.पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या टर्म साठी मी तयारच असुन पुढच्या निवडणुकीत माढ्याच्या आमदार शिंदे बंधुनी मला निवडुण आणण्याकरता सिंहाचा वाटा उचलला असुन पक्षाकडुन जो आदेश येईल.तो मी पाळणार असल्याचे खासदार निंबाळकर यांनी बोलताना साांगितले.
0 Comments