Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात एक राखी जवानांसाठी उपक्रम संपन्न

 लोकमंगल कृषी महाविद्यालयात एक राखी जवानांसाठी उपक्रम संपन्न


सोलापूर (कटुसत्य वृत्त):  श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्षाबंधनानिमित्त आपल्या जिवाची तमा न बाळगता, सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या भारतीय जवानांसाठी 'एक राखी जवानांसाठी' या उपक्रमाअंतर्गत राख्या पाठविल्या. महाविद्यालयातील सर्व कृषीकन्यांनी यात सहभाग नोंदवून अतिशय आकर्षक व मनोवेधक राख्या या उपक्रमासाठी जमा करून देशाची सेवा करणाऱ्या जवाना प्रती आपली भावना व्यक्त केली. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी या राख्यांची पॅकिंग करून देशाच्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या जवानांसाठी पोस्ट विभागामार्फत पाठविण्यात आल्या.सदरील उपक्रम राबवण्यासाठी महाविद्यालयातील प्रा.सुजाता चौगुले, प्रा.नम्रता गोरे, प्रा. सोनाली मासाळ, प्रा. आकाश अवघडे, प्रा. अजिंक्य ढोरे, प्रा. अजित कुरे आणि इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. 

Reactions

Post a Comment

0 Comments