माढेश्वरी अर्बन बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न्
सामाजिक बांधिलकीतुन १ सप्टेंबर पासुन माढ्यात नेत्ररुग्णालय सुरु करणार-आ. बबनराव शिंदे
माढा (कटूसत्य वृत्त):- केवळ खातेदार सभासदांच्या ठेवी घेणे,कर्जे देणे नफा मिळवणे इतक्या पुरतेच बॅकेचे मर्यादित काम न करता सामाजीक बांधिलकीतून विविध उपक्रमातून बँक कार्यरत आहे.
विश्वासाच्या पाठबळावरच ३२० कोटीच्या ठेवीचा माढेश्वरी अर्बन बँकेने टप्पा पार केला असुन १ सप्टेंबर पासून माढ्यात नेत्ररुग्णालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बॅकेचे चेअरमन तथा आमदार बबनराव शिंदेनी दिली.
माढेश्वरी अर्बन को बँकेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आमदार शिंदे बोलत होते.
बॅंकेच्या सभासदांच्या विश्वासामुळे व बॅंक कर्मचाऱ्यांच्या चिकाटीमुळे बॅंकेची वाटचाल प्रगतीपथावर आहे.मोडनिंब शहरात बॅंकेची ९ वी शाखा सुरू करणार असल्याचे सांगत बॅकेचा एनपी शुन्य टक्का असुन बॅकेच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती चेअरमन आमदार शिंदेनी दिली.प्रारंभी ग्रामदैवत माढेश्वरी व माजी आ.कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.वार्षिक सभेच्या प्रास्ताविकामध्ये बोलताना बॅंकेचे व्हाईस चेअरमन अशोक लुणावत म्हणाले की,हि बॅंकेकडे २०२ कोटी रूपयांच्या ठेवी आहेत.बॅंकेचा एकुण व्यवसाय ३९० कोटी रूपयांचा असून २ कोटी ४२ लाख रूपयांचा नफा बॅंकेला झाला असून गत वर्षीच्या तुलनेत ७४ लाख रूपये नफ्यात वाढ झाली असुन ऑक्टोबर २००० साली ताब्यात घेतलेल्या बॅकेने गरुडझेप झाली आहे. दत्तात्रय मुळे यांनी अहवाल वाचन केले तर गणेश काशिद यांनी आभार मानले.सभेस प्रा. गोरख देशमुख, दिगंबर माळी,अॅड.नाना शेंडे,राजेंद्र पाटील,अरविंद नाईकवाडी वाघ,संजय खरात यांचे सह बॅकेचे संचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment