स्व संग्राम कदम यांच्या स्मृतीदिनानिमित्त माढा येथे आयोजित रक्तदान शिबिरात 101 जणांचे उत्स्फूर्त रक्तदान....
माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील होतकरू विद्यार्थी स्व संग्राम उर्फ मुन्ना कदम याच्या स्मृतीदिनानिमित्त स्व संग्राम कदम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०१ जणांचे उत्स्फूर्त रक्तदान संपन्न झाले.
माढ्यातील गुरूकृपा हाॅस्पीटल येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माढ्याच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रारंभी स्व संग्राम कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास यावेळी नगराध्यक्षा अॅड.मिनल साठे उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद कानडे,राष्ट्रवादी चे माढा शहराध्यक्ष दत्तात्रय अंबुरे माणकोजी भुसारे, बाळू कदम,शिवशक्ती बॅकेचे उपव्यवस्थापक समाधान राऊत,डाॅ.विद्या क्षीरसागर यांचेसह संग्राम कदम प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व कुटूंबिय उपस्थित होते.कुंभारी येथील आश्विनी ब्लड बॅंकेच्या वतीने करण्यात आले.रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.सुुत्रसंचालन महेश भांगे यांनी तर आभार प्रदर्शन समाधान राऊत यांनी केले.कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment