'अँटी रॅगिंग ॲक्ट'मुळेच महाविद्यालयातील रॅगिंगचे प्रमाण कमी : डॉ. अचकनळळी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 14, 2023

'अँटी रॅगिंग ॲक्ट'मुळेच महाविद्यालयातील रॅगिंगचे प्रमाण कमी : डॉ. अचकनळळी

 'अँटी रॅगिंग ॲक्ट'मुळेच महाविद्यालयातील  रॅगिंगचे प्रमाण कमी : डॉ. अचकनळळी 


श्री सिद्धेश्वर वूमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अँटी रॅगिंग सप्ताह संपन्न 
 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर सिनीअर विद्यार्थनींनी केलेला शारिरीक किंवा मानसिक छळ म्हणजे रॅगिंग..!   रॅगिंगला आळा बसवण्यासाठी अँटी रॅगिंग ऍक्ट अस्तित्वात आला अशी माहिती विधीज्ञ (सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय) डॉ. वैशाली अचकनळळी यांनी दिली. श्री सिद्धेश्वर वूमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे १२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान अँटी रॅगिंग सप्ताह सुरु आहे. त्या अंतर्गत अँटी रॅगिंग ऍक्ट जागरूकतेवर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. प्रत्येकाला मूलभूत कायदे माहित असणे खूप गरजेचे आहे. कायदा हा सर्व विषयांचा राजा आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या कायदयाचे पालन करावेच लागते. त्यापैकी अँटी रॅगिंग ऍक्ट हा कायदा  १९९९ साली महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ऍक्टच्या अंतर्गत स्थापित झाला. महाविद्यालयातून होणाऱ्या रॅगिंगला आळा बसविण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने २००९ साली प्रत्येक विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर अँटी रॅगिंग ही कमिटी स्थापन करणे बंधनकारक केले आहे आणि यामुळे महाविद्यालयातील रॅगिंगचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यांनी मुलींना असे आवाहन केले की तुम्हाला जर कोणत्याही प्रकारच्या रॅगिंगला सामोरे जावे लागत असेल तर लगेच आपल्या पालकांना व कॉलेजमध्ये स्थापित असलेल्या अँटी रॅगिंग कमिटीकडे तक्रार करावी, तर वेळीच त्याला आळा बसेल. या ऍक्टच्या कायद्याअंतर्गत दोषी व्यक्तीला दोन वर्षे तुरुंगवास व १०,०००/- रु. दंडही आकाराला जाऊ शकतो. या कायद्याअंतर्गत रॅगिंग तक्रारीची नोंद झाल्यापासून ७ दिवसांच्या आत आवश्यक ती कारवाई करणे बंधनकारक आहे. याप्रसंगी त्यांनी महिलांसाठी असलेल्या इतर कायद्यांचीही माहिती दिली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी ए. चव्हाण , प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ अविनाश पाटील, इंडक्शन प्रोग्रॅम समन्वयक प्रा. संध्या पालमूर, शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रांजली शिंदे हिने केले व  आभार प्रदर्शन ख़ुशी कल्याणी हिने केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages