शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा : आडसुळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 14, 2023

शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा : आडसुळ

 शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा : आडसुळ 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई व संस्थापक सचिव श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था सोलापूर  पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संयोजक बापूसाहेब अडसूळ यांनी ही माहिती दिली. या पुरस्कार वितरण समारंभासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांना आमंत्रित केले आहे. सालाबादा प्रमाणे याहीवर्षी राज्यभरातील 100 शिक्षक व कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक व कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी आपले प्रस्ताव पुरस्कार गौरव समितीकडे 30 ऑगस्ट 2023 पर्यंत पाठवावेत असे आव्हान संयोजक बापूसाहेब आडसूळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages