भारतीय सण खगोलशास्त्र ,पर्यावरण, आरोग्य यांच्याशी निगडित आहेत---- डॉ.प्रभाकर कोळेकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 14, 2023

भारतीय सण खगोलशास्त्र ,पर्यावरण, आरोग्य यांच्याशी निगडित आहेत---- डॉ.प्रभाकर कोळेकर

भारतीय सण खगोलशास्त्र ,पर्यावरण, आरोग्य यांच्याशी निगडित आहेत---- डॉ.प्रभाकर कोळेकर



सोलापूर(कटूसत्य वृत्त):-आंतरराष्ट्रीय प्रार्थनायोग मंडळ, सोलापूर आयोजित प.पू. महातपस्वी कुमारस्वामींच्या 114 व्या जयंती महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे ५ वे पुष्प गुंफताना भारतीय सण व उत्सव हे खगोलशास्त्र, पर्यावरण, आरोग्य, आनंद यांच्याशी निगडित आहे असे प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर, संचालक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठ, अध्यासन केंद्र यांनी आजच्या आपल्या व्याख्यानात म्हणाले. भारतीय सण चंद्रमास व सौरमास यावर आधारित असून ऋतुचक्र बदलाप्रमाणे व तसेच अलौकिक व्यक्तीच्या जयंतीनुसार आपण सण साजरे करतो. चैत्र पाडवा हा नववर्ष ऋतुचक्र बदला प्रमाणे येतो. आपल्या सणामध्ये  पोळा हे प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, वटवृक्ष पूजा ही निसर्ग पूजा आहे. आषाढ मध्ये आपण एकादशी करतो ती आरोग्याशी निगडित आहे.  चातुर्मासात शाकाहार, उपवास व कमी बोलणे हे देखील आरोग्याशी निगडित आहेत. श्रावणामध्ये मंगळागौर हे स्त्रियांचे खेळ हे त्यांच्या मध्ये प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण व्हावी, आरोग्य चांगले राहावे, व्यायाम व्हावा यासाठी आहे. सणाच्या, उत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो त्यामध्ये आनंद साजरा करतो. त्यामुळे मानसिकता उत्तम राहते या सर्व गोष्टी च्या मागे विज्ञान दडलेले आहे असेही ते शेवटी म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात विश्वनाथ म्हेत्रे  यांच्या भक्ती गीताने झाली.  प्रमुख वक्ते डॉ.प्रभाकर कोळेकर यांच्या हस्ते स्वामीजींच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे सचिव बाबासाहेब कुलकर्णी यांचे हस्ते शाल व पुष्पहार, ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रार्थनायोग मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र मायनाळ यांनी उपस्थित आमचे स्वागत करून या संस्थेचे कार्य व व्याख्यानमालाचा उद्देश, स्वामीजींचे कार्य याबाबत माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष निळकंठप्पा कोनापुरे यांनी आभार प्रदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ चौगुले यांनी केले. पुढील दिवसाच्या कार्यक्रमाचे निवेदन व सामूहिक आरतीचे नेतृत्व विश्वनाथ म्हेत्रे यांनी केले.

सुभाष मुंडेवाडी, रामगोपाळ चौगुले दयानंद माशाळ, वेदमूर्ती बसवराज स्वामी राजू माशाळ, जयश्री करजगीकर, संध्यारजनी दानवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महाआरतीने कार्यक्रम संपन्न झाला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages