शहीद होनमाने विद्यार्थी व युवकांसाठी प्रेरणादायी नगरसेवक सुशील क्षीरसागर
पुळूज येथील जि.प.प्रा शाळेत प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- पुळूज जिल्हा परिषद शाळेने लोकवर्गणीतून प्रवेशद्वार उभा केले हे खरोखरच कौतुकास्पद असून, आपल्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला लाभलेले दत्ता पांढरे हे धडपडी असून त्यांनी अनेक कामे शाळेसाठी केली आहेत. शाळेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी शाळेचा कायापालट केला. गोरगरिबांचे विद्यार्थी या शाळेत शिकत असतात त्यामुळे शाळेत जी कामे केली आहेत ती कौतुकास्पद आहेत .शहीद धनाजी होनमाने यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम घेतला, रक्तदान शिबिर घेतले सामाजिक कार्यामुळेच शहीद धनाजी होनमाने स्मरणात राहतील शिवाय त्यांचे कार्य येथील विद्यार्थी व युवकांना प्रेरणा देईल असे वक्तव्य मोहोळ नगरपरिषदेचे नगरसेवक तथा भाजपाचे शहराध्यक्ष सुशील भैया क्षीरसागर यांनी केले व इथून पुढे पक्षाच्या किंवा माझ्या माध्यमातून जी मदत करता येईल ती करणार असल्याचा आशावाद यावेळी त्यांनी दिला.
पुळुज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकवर्गणीतून प्रवेशद्वार बांधण्यात आले. आणि शाळेसाठी स्वच्छ पाण्याची गैरसोय होत होती म्हणून नवीन पाणी फिल्टर बसवण्यात आला त्या पाणी फिल्टरचे देखील उद्घाटन झाले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुशील भैया क्षीरसागर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मनोहर (भाऊ) डोंगरे हे होते.यावेळी विनोद महाडिक, विरपिता तानाजी होनमाने, मारुती दोलतडे यांच्यासह भिमाचे मा.संचालक रतिलाल गावडे,सरपंच शिवाजी शेंडगे, लक्ष्मण पांढरे,पांडुरंग ताटे, जाकीर मुलाणी,राजाराम बाबर,भिवाजी शेंडगे ,मोहन खरात, मोहन गावडे,युवराज शिंदे, भारत पाटील,माणिक बाबर, स्मारक समिती अध्यक्ष लिंगादेव निळगुंडे, तुकाराम तेरवे, अनिल शेंडगे,सर्जेराव होनमाने,विकास होनमाने, विनायक पाटील, अण्णासाहेब शेंडगे समाधान लोमटे, शिवाजी लोमटे, नवनाथ खरात,लक्ष्मण लोमटे भगवान बाबर सर्जेराव कोरे , नागनाथ वाघमोडे,महादेव शेंडगे, लिंगादेव शेंडगे, विठ्ठल पांढरे, बालुसाहेब मुलाणी,बंडू बाबर, महेश कांबळे,दिलावर मुलाणी, बापू शिंदे,राजू माने, दत्तात्रय होनमाने,आणा कुंभार, स्वप्निल होनमाने, केंद्र प्रमुख ब्रह्मदेव घाडगे, मुख्याध्यापक तुकाराम गायकवाड आदीसह ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेसाठी भरपूर प्रमाणात कामे केली आहेत आधी शाळेला अध्यक्ष असतो हे माहित नव्हते पण ते मी कामातून दाखवून दिले. यात गावातील नेतेमंडळी सह विजयराज डोंगरे सुशील भैया शिरसागर यांची सहकार्य लाभले त्यामुळे शाळेचा कायापालट केला बाह्यअंग शाळा सुधारल्यामुळे गुणवत्ताही वरचेवर सुरुवात झाली आहे.

No comments:
Post a Comment