निसर्गाशी समरूप वास्तुत सुख मिळते....!... प्रा डॉ.महावीर शास्त्री
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
महा तपस्वी कुमार स्वामीजींच्या ११४ व्या जयंती महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे चौथी पुष्पगुंपताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून वास्तुशास्त्र या विषयावर वालचंद महाविद्यालयाचे प्राकृत संस्कृत विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ महावीर प्रभाकर शास्त्री यांनी आपल्या उगवत्या शैलीमध्ये उपस्थित सर्व त्यांना आपले विचार दिले.
निसर्गाशी समरूप असलेल्या वास्तूमध्ये आपणास सुख प्राप्त होते.
पूर्व कर्म म्हणजे गृहयोग, हुशारता आणि वास्तुशास्त्र या प्रमुख बाबी मुख्यता जीवनावर प्रभाव पडत असतात प्राचीन ऋषी म्हणून मी निसर्गाचा विचार करून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत वास्तू निर्मिती केली आहे आणि त्यातूनच सूर्यप्रकाश, वायु, जल ,पृथ्वीची चुंबकीय शक्ती, वास्तुशास्त्र ,वृक्ष, रंगसंगती ,घरातील चित्रे या सर्व घटकांचा परिणाम वास्तूमध्ये राहणाऱ्या माणसावर सुद्धा होत असल्याचे त्यांनी सांगितले .
घरातील रंग आलादायक फिकट असावेत जास्त घडत असू नयेत आणि घरातील चित्रे अल्लादायक मन प्रसन्न करणारी असावीत.
पुढे बोलताना ते म्हणाले, कोणतीही वास्तू 100% परिपूर्ण असू शकत नाही 60 ते 70 टक्के पूर्तता झाल्यास चांगले परिणाम मिळतात तसेच सकाळच्या कोवळ्या उन्हाचा फायदा मनुष्याला मोठ्या प्रमाणात होत असल्याचं शेवटी बोलताना त्यांनी सांगितलं.
यावेळी महास्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार प्राध्यापक महावीर शास्त्री यांच्या हस्ते घालण्यात आला त्यानंतर प्राध्यापक महावीर शास्त्री यांचा सत्कार उपाध्यक्ष नीलकंठप्पा कोणापुरे यांच्या हस्ते करण्यात आला.
योग मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी सर्वांचं स्वागत केलं.
तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव बाबासाहेब कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सुभाष मुंडेवाडी, रामगोपाळ चौगुले ,वेदमूर्ती बसवराज स्वामी, बसवराज कोळी, अमृत कोणापुरे ,सुरेश कापसे, दीपक नागणसुरी, संध्या रजनी दानवे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment