अधिकाऱ्यांना लयं मोठा पगार....! तरीही कार्यालयात अर्जांचं ढिगारं...!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आपण थाटामाटा अमृत महोत्सव साजरा केला असला तरी देशातील सर्वसामान्य नागरिकांना मात्र आपल्या मूलभूत गरजा अद्याप भागवता आल्या नाहीत. हे या सरकारचं अपयश कुणीच झाकू शकत नाही. भांडवलशाहीच्या या देशांमध्ये गरिबीत जन्माला येणं हेच फार मोठं पाप आहे की काय असा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांतून मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय. कारण आजही शहर आणि ग्रामीण भागातील असंख्य नागरिकांना आपल्या गरजा भागवण्यासाठी मायबाप सरकार पुढे हात पसरावे लागत असले तरी हे सरकार मात्र या सर्वसामान्य नागरिकांना सातत्याने ठेंगा दाखवत असल्याचे दिसत आहे. या देशातील अल्पभूधारक शेतकरी, कष्टकरी, मजूर ,कामगार ,अपंग, तसेच इतर सर्व घटक आपल्या गरजा भागत नसल्यामुळे सरकारकडे मदतीची सातत्याने मागणी करतात.
एक वर्षापूर्वी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांनी हातात घेतल्यानंतर ते सातत्याने हे सरकार गरिबांचे शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा असल्याचं सातत्याने पिपाणी वाजवतात .परंतू मुख्यमंत्र्यांचे हे भाषण फक्त बोलाचीच कडे आणि बोलाचाच भात असल्याचं आजवर दिसून आलेलं आहे. कारण सर्वसामान्य गरजू आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न या सरकारच्या काळात सुटत नसून अधिकच गडद होत चालल्याचे दिसत आहे. प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्नांची गुंता मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे एकीकडे शासन रेल्वे आणि एसटी तसेच इतर ठिकाणी शासन गतिमान शासन सुशासन अशा प्रकारच्या जाहिरातीतून सरकार चांगलं काम करत असल्याच्या घोषणा देत असले तरी वास्तविक पाहता संपूर्ण राज्यांमध्ये अधिकाऱ्यांचे फक्त वाढता य पगार आणि कार्यालयात दिसतायेत असंख्य अर्जाचे ढिगारे ही वस्तुस्थिती सर्वत्र आपल्याला बघायला मिळेल. अनेक टेबलवर एकच अधिकारी खेळून बसल्यामुळे त्या ठिकाणी हजारो फाईल धुळखात पडलेले आहेत त्याला या अधिकाऱ्यांनी मालपाणी न मिळाल्यामुळे बिलकुल हात लावला नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. कारण खिशात दाम असेल तरच होईल तुमचे काम हे अधिकारी आणि कर्मचारी बोलत नसले तरी त्यांचा अलिखित नियम हाच आहे हे मात्र नक्की..! जे नागरिक सुटा बुटात येतात किंवा वशिला सांगतात , अथवा काम होण्यासाठी अधिकाऱ्यांना चिरी- मिरीचं पाकीट देतात. अशा सर्व उमेदवारांना हे अधिकारी आणि कर्मचारी वाकून मुजरा करून त्यांची कामे तात्काळ करून त्यांना सन्मानाने घरी पाठवतात. परंतु जे सर्वसामान्य गरीब गरजू वर्षांवर्ष अनेक हेलपाटे मारून अधिकाऱ्यांना विनंत्या करतात. साहेब तेवढा आमचं काम करा अशा प्रकारची गयावया करतात त्यांना मात्र हे अधिकारी बघू....? करू..? अशी उडवा-पूर्वीची उत्तरे देऊन वेळ मारून घेत असल्याचे सर्वच शासकीय कार्यालयामध्ये आजवर दिसून आलेलं वास्तव चित्र आहे. अधिकाऱ्यांच्या या भ्रष्ट कामचुकार प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य माणसाचा प्रशासन व्यवस्थेवर असणारा विश्वास सध्या पूर्णपणे मरून पडलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मंदिर अर्थात मिनी मंत्रालय म्हणजे सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी अपंग अशा अनेक लाभार्थी आपल्याला न्याय मिळेल या भूमिकेतून सकाळी लवकर उठून जिल्ह्याच्या ठिकाणी येतात परंतु हे अधिकारी मात्र या लाभार्थ्यांना मी संधीग्ध उत्तरे देऊन त्यांना विनाकारण हेलपाटे मारायला लावत असल्याचेही आज वरचे चित्र आहे. कायद्याला अनेक पळवटा असल्यामुळे हे अधिकारी पळवाट शोधूनच काम करत असल्यामुळे दप्तर दिरंगाई चा कायदा सुद्धा या अधिकाऱ्याने झाकून ठेवल्यामुळेच न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न सध्या शेतकरी कष्टकरी वर्गातून विचारला जातोय.
.png)
No comments:
Post a Comment