माढा विधानसभा मतदारसंघ.... अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मंजूर.. आमदार बबनदादा शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 26, 2023

माढा विधानसभा मतदारसंघ.... अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मंजूर.. आमदार बबनदादा शिंदे

 माढा विधानसभा मतदारसंघ....

 अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी  पाच कोटी

 रुपये मंजूर.. आमदार बबनदादा शिंदे

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागातर्फे सामाजिक विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या गावांचा विकास करण्यासाठी व त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट माढा पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावासाठी पाच कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित दादा पवार यांचे कडे आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील कामांना मान्यता मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा केलेला होता, त्यानुसार 2023-24 वर्षासाठी शासनाकडून पाच कोटी रुपये  मंजूर झाले आहेत....
 माढा मतदारसंघातील समाविष्ट गावे ...
 माढा तालुका....१) उपळाई खुर्द ..दलित वस्ती अभ्यासिका बांधणे- २० लाख रु., कचरे वस्ती रस्ता तयार करणे १० लाख रु. २)उपळाई बुद्रुक.. गलेशीबाबा ते शाहू वाकडे रस्ता डांबरीकरण १० लाख रु.,.. गावडे वस्ती येथे पाणीपुरवठा बोरवेल पंप ५ लाख रु. ३)मानेगाव... अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण भूमिगत गटार फेविंग ब्लॉक पाणीपुरवठा समाज मंदिर १५ लाख रु.,४) मोडनिंब... दलित वस्ती अभ्यासिका बांधणे २० लाख रू., ....बौद्धविहार  सभागृह बांधणे १५ लाख रु. ५)दारफळ.... दलित वस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण व फेविंग ब्लॉक 10 लाख रू.,६) बेंबळे ...सलगर वस्ती कडे जाणारा रस्ता १० लाख रु. ,..वडार वस्ती स्ट्रेट लाईट बसवणे ५ लाख,७) चांदज... रुपनवर ते हेगडकर वस्ती अंतर्गत रस्ता करणे १० लाख रु.,८) टेंभुर्णी... वडार वस्ती येथे कॉंक्रिटीकरण रस्ता करणे १० लाख रु..., रामोशी वस्ती कडे येणारा रस्ता करणे १० लाख..., धनगर वस्ती रस्ता करणे १० लाख रु. ९) अंजनगाव खेलोबा.. शिवाजी वाघमोडे ते होनमाने वस्ती ..लोंढे वस्ती रस्ता करणे १० लाख रु...,१०) अकोले खुर्द... धोत्रे वस्ती ते घोडके वस्ती रस्ता करणे १० लाख रु.,.. करमाळा रस्ता ते नांदुरे वस्ती १० लाख..११) उजनी टे ...उजनी गाव ते गावठाण झोपड वस्ती दलित वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण १० लाख रु..
*** पंढरपूर तालुका
१) मेंढापूर... दलित वस्ती अभ्यासिका बांधणे २० लाख रु. ,..बिरोबा मंदिर समोर सभागृह बांधणे २० लाख रु.२)भोसे... दलित वस्ती येथे अभ्यासिका बांधणे २० लाख रु.,३) पटकुरोली... दलित वस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण ,भूमिगत गटार फेविंग ब्लॉक बसवणे, पाणीपुरवठा करणे ,समाज मंदिर बांधणे २० लाख रु. ...,नरसिंह वाडी ते पिंजारी वस्ती रस्ता १० लाख रु. ४)गुरसाळे... दलित वस्ती अंतर्गत काँक्रिटीकल रस्ते भूमिगत गटार फेविंग ब्लॉक पाणीपुरवठा समाज मंदिर बांधणे 15 लाख रु...., कोळेकर वस्ती पाचरस्ता भरणे १० लाखरु. ५)बाभुळगाव... अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण, भूमिगत गटार, फेविंग ब्लॉक, पाणीपुरवठा समाज मंदिर १० लाख रु.,६) रोपळे बुद्रुक... अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण भूमिगत गटार फेविंग ब्लॉक बसवणे पाणीपुरवठा समाज मंदिर बांधणे 15 लाख रु. ७)तुंगत.. अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण भूमिगत गटार फेव्हिंग ब्लॉक समाज मंदिर बांधणे पाणीपुरवठा 15 लाख रु.,८) शेगाव दुमाला... अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण भूमिगत गटार फेविंग ब्लॉक बसवणे पाणीपुरवठा समाज मंदिर बांधणे 15 लाख रु. ९)करकंब.. वडार समाज भवनाच्या उर्वरित कामासाठी २० लाख रु. ...,गायकवाड वस्ती येथे शेवते रोड जवळ रस्ता करणे १० लाख रु।...१०) शेवते... रवींद्र जाधव घर ते पेहे रस्ता कॉंक्रिटीकरण १५ लाख रु. ११)सुस्ते ....रस्ते काँक्रीटकरण ,भूमिगत गटार ,फेव्हींग ब्लॉक, पाणीपुरवठा, समाज मंदिर बांधणे 15 लाख रू.
१२) पीराची कुरोली ..तळवाट ते भुई वस्ती रस्ता तांडवस्ती रस्ता सुधार योजनेतून २० लाख रू
१३) ईश्वर वठार.. सुभाष नगर देशमुख वस्ती अंतर्गत काँक्रेटिक काँक्रीट व्यवस्था ठेवींग ब्लॉक 10 लाखरु.
 माळशिरस तालुका....
१) लवंग... दलित वस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण भूमिगत गटार फेविंग ब्लॉक बसवणे पाणीपुरवठा समाज मंदिर बांधणे १० लाख रु.,२) वाफेगाव... दलित वस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण भूमिगत गटार फेविंग ब्लॉक बसवणे पाणीपुरवठा समाज मंदिर बांधणे १० लाख रु. ३)बोरगाव... दलित वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण भूमिगत गटार पाणीपुरवठा फेविंग ब्लॉक समाज मंदिर बांधणे 15 लाख रु.,४) नेवरे.. दलित वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण भूमिगत गटार फेविंग ब्लॉक समाज मंदिर बांधणे 15 लाख .रु

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages