बापूजी नगर येथे रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 26, 2023

बापूजी नगर येथे रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ

 बापूजी नगर येथे रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रस्ते होत

 आहेत चकाचक



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत प्रभाग १३ अ मधील बापूजी नगर येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून दिवंगत नगरसेवक सुनिल कामाठी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या डांबरीकरण व काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुनिता कामाठी यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून बापुजी नगर आणि परिसरातील रस्ते डांबरीकरणासाठी ३८ लक्ष रूपयांची कामे मंजूर झाली आहेत. यातून येथील रस्ते चकाचक होत आहेत. त्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

डांबरीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक अभियंता अविनाश वाघमारे, अवेक्षक चेतन प्रचंडे, सुनिता कामाठी, अंकुश अलकुंटे, महेश अलकुंटे, सुनिल म्हेत्रे, नारायण मोरे, कुमार चन्ना, हिंदूराष्ट्र सेनेचे शहर अध्यक्ष रवि गोणे, भीमा आसादे, लक्ष्मण म्हेत्रे, सतिश अलकुंटे, उमेश अलकुंटे, प्रकाश आसादे, हणमंत पेद्दी, ऋषी घोलप, मंगेश कांबळे, राधाबाई म्हेत्रे, अश्विनी अलकुंटे, ललिता गोन्नेल, श्रीमती येलेरी, रेशमा येळणे, शोभा येळणे, शिवगंगा जावळे, कविता पांढरे, आशा कामाठी, निर्मला कामाठी, महानंदा बिराजदार, किशोर येळणे, सुरेश येळणे, मल्लिकार्जुन पाटील, शिवकुमार कामाठी आदींसह सदर परिसरातील प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनीं उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages