अधिक महिन्यात विठ्ठलचरणी भरघोस दान; मंदिर समितीस तब्बल सव्वासात कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

अधिक महिन्यात विठ्ठलचरणी भरघोस दान; मंदिर समितीस तब्बल सव्वासात कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न

 अधिक महिन्यात विठ्ठलचरणी भरघोस दान; मंदिर समितीस तब्बल सव्वासात कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- अधिक महिन्यात विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस तब्बल सात कोटी १९ लाख ४३ हजार ३७ रुपये इतके उत्पन्न मिळाले. तीन वर्षापूर्वी २०१८ मध्ये अधिक महिन्यात दोन कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपये उत्पन्न मिळाले होते.
त्या तुलनेत यंदाच्या अधिक महिन्यात तब्बल चार कोटी ८६ लाख ९१ हजार ११३ रुपये जास्त उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
अधिक महिन्यात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यंदादेखील अधिक महिन्यात ६ लाख ३९ हजार ९१७ भाविकांनी पदस्पर्श तर सुमारे पाच लाख भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला. लाखो भाविकांनी गर्दीमुळे चंद्रभागेवर स्नान करून दर्शन रांगेत न थांबता विठुरायाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानले.
अधिक महिन्यात सोने-चांदीच्या वस्तू विठुरायास भाविकांकडून मोठ्या संख्येने अर्पण केल्या जातात. यंदा २४ लाख ९८ हजार ८९० रुपये किमतीचे सोने आणि ८ लाख १८ हजार ८५९ रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू भाविकांकडून अर्पण करण्यात आल्या. या देणगीतून भाविकांना अत्याधुनिक आणि चांगल्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages