महामार्गावरील दुभाजकामधील गवत काढणाऱ्या मजुराला घाम येऊन त्याचा मृत्यू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

महामार्गावरील दुभाजकामधील गवत काढणाऱ्या मजुराला घाम येऊन त्याचा मृत्यू

 महामार्गावरील दुभाजकामधील गवत काढणाऱ्या मजुराला घाम येऊन त्याचा मृत्यू



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकामधील गवत काढताना एका मजूराला घाम येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार ता. 19 रोजी सायंकाळी 4 वाजता देवडी, ता. मोहोळ हद्दीत घडली. मल्लिकार्जुन भीमण्णा इंचुरे (वय-55, रा. लाजा, ता. भालकी, जिल्हा बिदर) असे मृत मजुराचे नाव आहे.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शनिवार ता. 19 रोजी मल्लिकार्जुन इंचुरे व त्याचे इतर मजूर साथीदार सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी हद्दीतील दुभाजका मधील गवत काढत होते. दुपारी चार वाजता इंचुरे यास अचानक घाम आला व अस्वस्थ वाटू लागले. विश्रांतीसाठी म्हणून ते रस्त्याच्या कडेच्या झाडाखाली जाऊन झोपले. त्यांना त्या ठिकाणी सोडून इतर साथीदार पुढील कामासाठी गेले. सायंकाळी साडेपाच वाजता काम संपल्यावर घरी जाण्यासाठी देवडी हद्दीत झोपलेल्या मल्लिकार्जुन इंचुरे यास पाहण्यासाठी सर्वजण गेले असता, तो झोपलेल्या अवस्थेत होता. इतर साथीदारांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला पण त्याची हालचाल दिसून आली नाही.
त्यास रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या घटनेची खबर महादेव बाबुराव बिरादार (वय-34, रा. वागलगाव, ता. भालकी, सध्या रा. मोडनिंब) याने मोहोळ पोलिसात दिली आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages