आयुष शहाने 'सायन्स ऑलिम्पियाड' परीक्षेत मिळविला जागतिक पातळीवर प्रथम क्रमांक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

आयुष शहाने 'सायन्स ऑलिम्पियाड' परीक्षेत मिळविला जागतिक पातळीवर प्रथम क्रमांक

 आयुष शहाने 'सायन्स ऑलिम्पियाड' परीक्षेत मिळविला जागतिक पातळीवर प्रथम क्रमांक

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- 'वंदा इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड 2023' या परीक्षेत मोहोळ येथील आयुष विनय शहा याने जागतिक प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

वंदा इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड ही परीक्षा दर वर्षी जागतिक पातळीवर घेण्यात येते.या मध्ये 38 देशातील 50 हजारा हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या परीक्षेत यश मिळाल्याने डिसेंबर 2023 मध्ये सिंगापूर येथे घेण्यात येणार्‍या "स्टीम अहेड" या परीक्षे साठी आयुषची निवड झाली आहे.

मागील वर्षी आयुषचा नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत देशात प्रथम क्रमांक आला होता. तसेच विद्यार्थी विद्यान मंथन ,ह्या वाराणसी येथे झालेल्या परीक्षेत ही त्याला राज्य पातळी वरील पाहिले व देश पातळीवरील तिसरे पारितोषिक मिळाले होते.

आयुषला नृत्याची देखील आवड असून, त्याने "लिटिल चॅम्प" या स्पर्धेत ही प्रथम क्रमांक मिळविला होता. तो एमआयटी विश्वशांती गुरुकुल या शाळेचा विद्यार्थी आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य मनिष पुरानी, सर्व शिक्षक वर्ग,आई डॉ स्फुर्ती शहा, वडील डॉ विनय शहा यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages