अनगर येथे माजी सैनिकांच्या हस्ते कोनसीलेचे अनावर अनावरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 17, 2023

अनगर येथे माजी सैनिकांच्या हस्ते कोनसीलेचे अनावर अनावरण

 अनगर येथे माजी सैनिकांच्या हस्ते कोनसीलेचे अनावर अनावरण


अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील  कै.शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर व नगरपरिषद अनगर राष्ट्रीय सेवा योजना +2 यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या अभियानाद्वारे किरण सूर्यवंशी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती मोहोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी प्रशालेचे प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी पंचप्रण शपथ दिली.
मेरी माटी मेरा देश अंतर्गत माती कलशात जमा करण्यात आली.  यावेळी अनगर परिसरातील माजी सैनिकांचा सन्मान करून वीरांना वंदन करण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी सैनिक भास्कर पाचपुंड, सुरेश कारमकर, रमेश मोरे, अल्लाबक्ष शेख, सुरेश आरडक, राजेंद्र सावंत, मारुती गोडसे, गणेश गुंड, आबाराव गुंड, चंद्रकांत इताले, रामेश्वर लवळे, अमीन मुलानी, गणेश गुंड आदी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
 अनगर येथे बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण माजी सैनिक आबाराव गुंड यांच्या शुभहस्ते करण्यात आले आणि सर्व सैनिकांच्या हस्ते अमृत वाटिका व वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत ढोले ,बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी उपमुख्याध्यापक सिताराम बोराडे पर्यवेक्षक चंद्रकांत यावलकर ,अनगर नगरपंचायत चे कर्मचारी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर सिताराम बोराडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages