सोलापूर महापालिकेच्या वतीने आयुक्त तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 17, 2023

सोलापूर महापालिकेच्या वतीने आयुक्त तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण

 सोलापूर महापालिकेच्या वतीने आयुक्त तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज इंद्र भवन येथे महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त विद्या पोळ,उपायुक्त मच्छिंद्र घोलप,सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत,मुख्य लेखा परीक्षक रूपाली कोळी तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ध्वजा रोहन झाल्यानंतर  महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ तसेच पंच प्रण शपथ यावेळी दिली. तसेच प्रतिवर्षीप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या अधिकारी व  कर्मचारी गुणवंत पुरस्कार मा आयुक्त यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या मोफत बस सेवा संदर्भात महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते उपस्थिती मुलींना मोफत बसचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages