आ. सातपुते यांच्या प्रयत्नातून माळशिरस, नातेपुते नगरपंचायत व अकलूज नगरपरिषदेसाठी दहा कोटी रुपयांचा निधी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील माळशिरस, नातेपुते नगरपंचायत व अकलूज नगरपरिषदेसाठी माळशिरसचे आ राम सातपुते यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागामार्फत नगरपंचायत व नगरपरिषदेतील वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी 10 कोटीचा निधी मंजूर केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे
नातेपुते नगरपंचायती साठी 6 कोटी 5 लक्ष निधी, माळशिरस नगरपंचायती करिता 3 कोटी 95 लक्ष रु निधी व अकलूज नगरपरिषदेसाठी 3 कोटी 16 लाख रु निधी मंजूर करण्यात आला. यामध्ये अकलूज नगरपरिषद हद्द्दीत स्ट्रीट लाईट बसवणे, नातेपुते नगरपंचायातीस स्ट्रीट लाईट बसवणे व भूमिगत गटार बांधणे, माळशिरस नगरपंचायतीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी उद्यान,छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, महात्मा फुले उद्यान तसेच विविध सभामंडप व संत सेना भवन आदी कामांकरिता हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
चौकट
माळशिरसचे आ राम सातपुते हे सातत्याने माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद करीत आहेत याच अनुषंगाने माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीतील छ. शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले अशा सर्वच महापुरुषांच्या उद्यान विकासासाठी व सुशोभीकरण करण्यासाठी, सभा मंडप व रस्ते दुरुस्तीसाठी भरीव निधीची तरतूद केल्याने समस्त माळशिरसकर समाधानी आहेत आ राम सातपुते यांचा माळशिरस चा प्रथम नागरिक या नात्याने सर्व समाजाच्या वतीने भव्य सत्कार करणार .
- आप्पासाहेब देशमुख, नगराध्यक्ष माळशिरस नगरपंचायत
.jpg)
No comments:
Post a Comment