मालट्रक व मोटरसायकल यांच्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 18, 2023

मालट्रक व मोटरसायकल यांच्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

 मालट्रक व मोटरसायकल यांच्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- रॉंग साईडने भरधाव येऊन, ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वाराला मालट्रकने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील युवकाचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात अनगर ते माढा रस्त्यावर अनगर शिवारातील वासुदेव गुंड यांच्या शेतासमोर, तारीख 15 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता झाला. संतोष शिवाजी माने (वय-29, रा. गलंदवाडी, ता. मोहोळ) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मालट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गलंदवाडी येथील रहिवाशी संतोष माने हा त्याच्या मोटरसायकल क्रमांक एम एच 13/ इडी 93 85 वरून माढ्याकडे जात होता. त्यावेळी अनगर शिवारातील वासुदेव गुंड यांच्या शेतासमोर तो आला असता समोरून भरधाव येणाऱ्या मालट्रक क्रमांक डीडी 01/ एफ 9933 हिने ओव्हरटेक करण्याच्या नादात रॉंग साईडला येऊन संतोष माने याला जोराची धडक दिली. त्यात माने याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला व जागीच मृत्यू पावला.

या प्रकरणी विठ्ठल बाळू माने (वय-32, रा. गलंदवाडी) यांच्या फिर्यादी वरून भरत राधेश्याम यादव, (रा. पेरबा, पोस्ट देवगाव, ता. लालगंज, जिल्हा अझमगड, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ज्योतीबा पवार करीत आहेत.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages