अ.भा.माळी शिक्षण संस्थेचे वतीने माळीनगरच्या विद्यार्थ्यांचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 18, 2023

अ.भा.माळी शिक्षण संस्थेचे वतीने माळीनगरच्या विद्यार्थ्यांचा सन्मान

 अ.भा.माळी शिक्षण संस्थेचे वतीने माळीनगरच्या विद्यार्थ्यांचा सन्मान



अकलूज (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था पुणे यांचे वतीने माळीनगर येथील इ.१० वी व इ.१२ वी मधील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.संभाजी राऊत यांचे हस्ते रोख पारितोषिक,प्रमाणपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले.
              पुणे येथील अ.भा.माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येत असते.
      फेब्रुवारी-मार्च २३ मध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेत येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेतील इ.१० वीतील कु.मोसमी प्रवीण बोरावके(प्रथम),संचित रितेश  पांढरे(द्वितीय),कार्तिक विनायक गिरमे (तृतीय); तर  इ.१२ वी बोर्ड परीक्षेती
ल कु. प्रज्ञा राजाराम शिंदे(प्रथम),कु.आकांक्षा गजानन म्हेत्रे(द्वितीय),कु.आरती शशिकुमार माळी(तृतीय); आणि गुलमोहर इंग्लिश मेडियम मधील इ.१० वी बोर्ड परीक्षेतील निनाद गितेश पांढरे (प्रथम),मयूर प्रीतम पेटकर(द्वितीय)ओम अमित एकतपुरे(तृतीय); या सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देवून सत्कार करण्यात आला.
          या कार्यक्रमाप्रसंगी दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे,मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे,संचालक निखिल कुदळे,विशाल जाधव,शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे, संचालक सुरेश राऊत, सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त चंद्रकांत जगताप,व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी प्रकाश गिरमे,संचालक अजय गिरमे,ॲड.सचिन बधे,कल्पेश पांढरे,दिलीप इनामके,संचालिका ज्योतीताई लांडगे,ॲड.आदिनाथ भगत आदि विविध संस्थांचे पदाधिकारी,पालक ग्रामस्थ,शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages