जिल्हाधिकारी कार्यालयातअपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रणची शपथ दिली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 9, 2023

जिल्हाधिकारी कार्यालयातअपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रणची शपथ दिली

जिल्हाधिकारी कार्यालयातअपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रणची शपथ दिली

 सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत संपूर्ण देशभरात 'मेरी माटी मेरा देश' (माझी माती माझा देश) हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रण ची शपथ दिली.

     यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवारउपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुखउपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागरभूसंपादन अधिकारी संतोष देशमुखउपजिल्हाधिकारी सुमित शिंदेजिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोंपेतहसीलदार महसूल दत्तात्रय मोहोळेतहसीलदार पुनर्वसन अमोल कुंभार,  एन आय सी चे उत्कर्ष होनकळसे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

        स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा आज दिनांक 9 ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे. त्यानिमित्त मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत पंचप्रण शपथ आयोजित करण्यात आलेली आहे. आम्ही शपथ घेतो कीभारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करूअशी शपथ अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली.

     माझी माती माझा देश या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयात पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता आयोजित करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्देश देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयानी त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ देण्याचा उपक्रम त्यांच्या कार्यालयात आयोजित केलेला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages