पंढरपुरात ऑगस्ट क्रांती दिन व युवक कॉंग्रेसचा वर्धापन साजरा भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचा संकल्प करा- शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 9, 2023

पंढरपुरात ऑगस्ट क्रांती दिन व युवक कॉंग्रेसचा वर्धापन साजरा भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचा संकल्प करा- शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी

 पंढरपुरात ऑगस्ट क्रांती दिन व युवक कॉंग्रेसचा वर्धापन साजरा

भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचा संकल्प करा- शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी

पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-9 ऑगस्ट क्रांती दिन व युवक कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पंढरपूर येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा स्तंभाचे  पुजन सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनंजय पवार यांच्याहस्ते तर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूर शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संदिप शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कॉंग्रेस कमिटीच्यावतीने अभिवादन करण्यात आले.  यावेळी पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी प्रास्ताविकात क्रांती दिनाचे महत्व सांगितले ते म्हणाले की, आजच्याच 9 ऑगस्टच्या दिवशी महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना भारत देशातून बाहेर काढण्यासाठी भारत छोडो, चले जाव या आंदोलनाची घोषणा केली होती या दिवसाला संपूर्ण भारत देशाच्या इतिहासात 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार आपण ही आजच्या क्रांतीदिनादिवशी भाजपमुक्त भारत हा संकल्प केला पाहिजे. गेल्या 9 वर्षांमध्ये भाजपचे जीएसटी, नोटाबंदी हे विषय फसले आणि देशात सर्वप्रकारची वाढती महागाई हा सर्वसामान्यांसाठी अडचणीचा विषय बनत आहे मात्र सरकारकडून यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही केवळ गोड बोलून लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आले आणि लोकांना संकटाच्या खाईत टाकले अशी भाजपची निती आहे त्यामुळे अशा भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणूकीत सत्तेतून बाजूला करत पुन्हा एकदा कॉंग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच युवक कॉंग्रेसची स्थापना ही युवकांना एकत्र आणून समाजातील विविध सामाजिक प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी केली असल्याचे पंढरपूर शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष बजरंग बागल, जिल्हा सरचिटणीस राजू उराडे, पंढरपूर तालुकाध्यक्ष हणमंत मोरे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव शंकर सुरवसे, सोलापूर जिल्हा किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल पाटील, किसान कॉंग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष अक्षय शेळके, विधानसभा युवक अध्यक्ष बलदेव शिकलकर, सेवा दल शहराध्यक्ष गणेश माने, शिवाजी धोत्रे, दत्तात्रय बडवे, तात्या फडतरे, पप्पू माने, देवानंद इरकल, नागनाथ अधटराव, शशिकांत चंदनशिवे, सोमनाथ आरे, शिवकुमार भावलेकर आदि कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थितांचे आभार ओबीसी सेल माजी जिल्हाध्यक्ष समीर कोळी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages