*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोर्टी ता.पंढरपुर येथे रक्षाबंधनाचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा - --* - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 31, 2023

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोर्टी ता.पंढरपुर येथे रक्षाबंधनाचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा - --*

 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोर्टी ता.पंढरपुर येथे रक्षाबंधनाचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा - --


पंढरपुर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोर्टी येथे रक्षाबंधनाचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या सणाचे महत्व म्हणजे बहिण भावाला  उदंड निरोगी आयुष्य लाभो,  आपला  भाऊ चांगला कर्तबगार  झाला पाहिजे, अशी परमेश्वराकडे मनोमन प्रार्थना करते  आणि भाऊ सुद्धा बहीण कोणत्याही संकटात असेल तर मी निश्चितपणे तिच्या रक्षणासाठी धावून जाईल, असा विश्वास व्यक्त करतो .अगदी त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

        यानंतर विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरात असलेल्या झाडांनाही राख्या बांधून त्यांचं रक्षण करण्याचं ,जतन करण्याचे आणि त्यांना वाढवण्याचं काम निश्चितपणे आम्ही सर्व विद्यार्थिनी करू अशा पद्धतीने भावना व्यक्त केल्या. 
        यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रामदासी मॅडम  नामदेव सरवदे सर,  बापूसाहेब मिसाळ सर अरुण पाटील सर तसेच अनुराधा बोंदर मॅडम आणि शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages