जनतेच्या आरोग्यासाठी "आयुष्मान भव' मोहिमेस सुरवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 31, 2023

जनतेच्या आरोग्यासाठी "आयुष्मान भव' मोहिमेस सुरवात

 जनतेच्या आरोग्यासाठी "आयुष्मान भव' मोहिमेस सुरवात सार्वजनिक

 आरोग्य विभागाचा उपक्रम,आरोग्य संबंधित विविध योजनांचा समावेश


         सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- केंद्र शासनाचा अत्यंत महत्वांकाक्षी मोहीम म्हणजे "आयुष्मान भव' हि मोहिम सोलपुर जिल्हयामध्ये १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत राबविणेत येत असून यामध्ये आयुष्मान कार्ड व आभा कार्ड बाबत जनजागृती करणे, आरोग्यवर्धिनी  केंद्रांमार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग इ. बाबत जनजागृती करणे तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर मिळणा-या सेवा सुविधांचे मुल्यमापन करणे हा मूळ उद्देश या मोहिमेचा असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा  आव्हाळे यांनी सांगितले . सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त सूचनानुसार आरोग्य विभागाची बैठक मनिषा आव्हाळे यांनी घेतली यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील,सह संचालक कृष्ठरोग डॉ.मोहन शेगर ,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी,जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण  मिरकले ,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.विलास सरवदे आदी उपस्थित होते.

          पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा  आव्हाळे म्हणाल्या ,या मोहिमेत आयुष्मान आपल्यादारी , आयुष्मान सभा , आयुष्मान मेळावा व  अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी उपक्रम राबिवण्यात येणार आहेत. आयुष्मान आपल्यादारी या उपक्रमांतर्गत आजतागायत संपूर्ण देशात २५ कोटी आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. या अनुषंगाने या उपक्रमांतर्गत सर्व जिल्हयांमधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करुन आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात येणार आहे. आयुष्मान सभा उपक्रमांतर्गत गावपातळीवर आरोग्य सेवा सुविधांची जनजागृती करण्याकरीता ग्रामपंचायत व ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचा उपयोग करण्यात येणार आहे. आयुष्मान कार्ड व आभा कार्ड बाबत जनजागृती करणे, आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग इ. बाबत जनजागृती करणे, तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर मिळणा-या सेवा सुविधांचे मुल्यमापन करणे हे मोहिमेचे मुळ उद्दीष्ट आहे.तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा पहिल्या प्रसुतीच्या रु 5000 लाभाव्यतिरिक्त दुसऱ्या प्रसुती वेळी ज्यांना जानेवारी 2023 नंतर मुलगी अपत्य झाले अशांना अतिरिक्त रुपये 6000 चा लाभ होणार आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

         महिन्याच्या  प्रत्येक शनिवारी  आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर मधुमेह,उच्च रक्तदाब,तोंडाचा कर्करोग , स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग,क्षयरोग ,कृष्ठरोग व इतर संसर्गजन्य रोग ,पोषण व लसीकरण,माता व बाल आरोग्य तसेच आयुष्मान व आभा कार्ड तयार करणे ,सर्व समावेशक आरोग्य सेवा ,आयुष ,मानसिक आरोग्य,वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, मौखीक आरोग्य,नेत्र, नाक, कान व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा, योगा व वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी करण्यात येणार आहे.

         ३२ सामान्य आजारांची वेळेवर तपासणी व उपचार करावेत. तसेच आवश्यकता असल्यास जिल्हा रुग्णालय स्तरावर शस्त्रक्रिया करण्याकरीता संदर्भित करण्यात यावे. तसेच आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे उपलब्ध करुन देण्यात येतील .उपक्रमांसोबतच १ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान सर्व आरोग्य संस्थांमध्ये सेवा पंधरवाडा राबविण्यात यावा. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व संस्थांचे स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबविण्यात येईल.सर्व उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणा-या ग्रामपंचायत यांना आयुष्मान ग्रामसभा यांनी प्रमाणित केल्यानंतर जिल्हा स्तरावरुन प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.त्याअनुषंगाने आरोग्य विभागमार्फत  "आयुष्मान भव" या केंद्र शासनाच्या महत्वांकाक्षी योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हयातील संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन  या उपक्रमाची सुरुवात करुन उपक्रमाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार त्यांना कृती आराखडा तयार करण्याबाबत व त्यानुसार कार्यक्रम अंमलबजावणी करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या    

   डॉ.संतोष नवले                                                                                                    

जिल्हा आरोग्य अधिकारी

जि.प.सोलापूर.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages