Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर सिंहगडमध्ये पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न

 सोलापूर सिंहगडमध्ये पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न


सोलापूर (कटुसत्य वृत्त):- केंगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रिकल विभागात सोलार तंत्रज्ञान,पीसीबी डिझाईन आणि ऑरडीनो या विषयावर २३ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट  पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार बिरादार, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. अनिल कोठमाळे यांच्या हस्ते करण्यात आले व ही कार्यशाळेमध्ये अपट्रोन टेक्नॉलॉजी सातारा यांच्या मार्फत घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये ऑरडीनो टेक्नॉलॉजी,पीसीबी डिझाईन व सोलार तंत्रज्ञान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन संकेत गुरव यांनी केले तर या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अनिल कोठमाळे  यांनी काम पाहिले. या कार्यशाळेसाठी इलेक्ट्रिकल विभागातून ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेसाठी इलेक्ट्रिक विभागातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments