माढा पाणी टंचाईची तलवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 25, 2023

माढा पाणी टंचाईची तलवार

 माढा पाणी टंचाईची तलवार


 माढा(कटूसत्य वृत्त):- आष्टी तलावातील पाणीसाठा पाच दिवस पुरेल एवढाच शिल्लक राहीला  असल्याने माढा शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार असुन पाणी टंचाई ची टांगती तलवार शहरवासियांपुढे असणार आहे. शहरातील पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नगरपंचायतीने पावले उचलली आहेत.उजनी धरणातून आष्टी  तलावात पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अॅड. मिनल साठे यांनी पत्रव्यवहार सुरु  केला आहे. 

माढा शहराला आष्टी (ता. मोहोळ) येथील तलावातून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे करण्यात येतो. मात्र यंदा आष्टी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला नाही. शिवाय उजनी धरणातही केवळ 13  टक्केच पाणीसाठा शिल्लक  असल्याने धरणातून कालव्याद्वारे तलावात पाणी सोडण्यात आले नाही.यामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट आहे.शिवाय आष्टी तलावातील पाणीसाठा संपत आल्याने शहरवासियांना खराब पाणीपुरवठा होत आहे.तसेच सध्या आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे.आष्टी तलावात उजनी धरणातून पाणी न सोडल्यास माढा शहरावर मोठे जलसंकट ओढवणार आहे.टंचाईच्या काळात पर्यायी पाणीपुरवठा करता यावा यासाठी शहरतील बहुतेक सर्व प्रभागात विंधन विहिरी व हौद उपलब्ध आहेत. या विंधन विहिरींवरील विदयुतपंप व इतर दुरूस्त्या करुन ज्या विंधन विहीरींना पाणी आहे त्या विंधन विहिरी तातडीने सुरू करण्याची गरज आहे.

उजनी धरणातून आष्टी तलावात पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्रव्यवहार केला आहे. शिवाय शहरातील विंधन विहिरी सुरू करण्यासाठी विंधन विहिरींवरील विदयुतपंप दुरूस्तीचे टेंडर 
काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.-
- पुजा दुधनाळे - पाटील
( मुख्याकारी माढा नगरपंचायत) 

आष्टी तलावातील पाणीसाठा संपत आला आहे.  पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी व उजनीतून आष्टी तलावात पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. शहरवासियांना पाणी कमी देणार नाही मात्र नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.-
अॅड. मीनल साठे
( नगराध्यक्षा, माढा नगरपंचायत)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages