पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूटमधील कौशल्य विकास बोर्डाच्या विविध कोर्सेसचे निकाल जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 25, 2023

पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूटमधील कौशल्य विकास बोर्डाच्या विविध कोर्सेसचे निकाल जाहीर

 पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूटमधील कौशल्य विकास बोर्डाच्या विविध कोर्सेसचे निकाल जाहीर


 सातारा (कटुसत्य वृत्त):  माहे जुलै २०२३ मध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई (एमएसबीएसव्हीइटी) बोर्डद्वारे घेण्यात आलेल्या पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट सातारा मधील इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑन कन्स्ट्रक्शन साईट, ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन या कोर्सेसचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आल्याची माहिती पाटील इलेक्ट्रॉनिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनीलकुमार गो. पाटील यांनी सांगितले. यामधील पहिला कोर्स इलेक्ट्रिकल सुपरवायझर कोर्सेसचा निकाल ९६% टक्के लागला असून जवळजवळ २३ विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली आहे व यामधील दुसरा कोर्स ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन या कोर्सचा निकाल ८० टक्के लागला असून क्रमशः आकाश थोरात, गणेश पवार व अभिजीत जाधव असे तीन विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक पटकावलेले आहेत. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.. अभिनंदन करण्यात आले आणि पुढील भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आले. विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष सुनीलकुमार गो. पाटील तसेच प्राचार्य सुजित पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages