कुसुर येथे मोफत आरोग्य शिबीर राबवण्यात आले. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 25, 2023

कुसुर येथे मोफत आरोग्य शिबीर राबवण्यात आले.

 कुसुर येथे मोफत आरोग्य शिबीर राबवण्यात आले.


सोलापूर (कटूसत्य वृत्त): कुसूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित लोकमंगल कृषी महाविद्यालयातील कृषिदुतांनमार्फत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत दि.२५/०८/२०२३  रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले .या मोहिमेत डॉ.शक्तिजीत मोहन बाबर (लोकमंगल आयुर्वेदिक रुग्णालय- वडाळा) आणि त्यांचे सहकारी किरण वाघमोडे , शितल गायकवाड, पांडुरंग भिसे ,समाधान डावरे आदी यांच्या माध्यमातून मोफत  उपचार  करणात आले  - बीपी , गुडघेदुखी, सर्दी-खोकला, ताप व इतर आजारांवर  मोफत औषध-गोळ्या देण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात कुुसूर  गावाचे सर्व ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती व न्यू इंग्लिश हायस्कूलचे चेअरमन मा. सुनिल नांगरे सर यांच्या हस्ते  डॉ.शक्तिजीत मोहन बाबर यांच्या स्वागत  करून कार्यक्रमास सुरुवात केली. आरोग्य शिबिर राबविण्यात लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. सचिन फुगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. आकाश अवघडे, व सलमान शेख यांचे मार्गदर्शन लाभले व  कार्यक्रमाचे आयोजक कृषीदूत -बनसोडे प्रतिक,बनसोडे यश, बनसोडे ऋतुराज, कलवापल्ली विष्णू रेड्डी, चव्हाण दीपक, घागरे सौरभ,दहिटणे ओंकार इ. सहभागी होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages