माढ्यातील अक्षय शरद ताकमोगे महाराष्ट्र लोकसेवा आयोग रेंज फॉरेस्ट ऑफिसर पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम
माढा (कटूसत्य वृत्त):-माढ्यातील अक्षय शरद ताकमोगे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अक्षय याचे प्राथमिक शिक्षण माढयातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण माढ्यातील सहकारमहर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेत झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण लातूर येथील त्रिपुरा महाविद्यालयात झाले आहे. पुण्यातील माॅर्डन काॅलेजमधून मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर २०१७ पासून पुण्यातच त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर पदांच्या तेरा जागांसाठी परीक्षा झाली. त्यात अक्षयने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कोणतेही खासगी क्लास न लावता त्याने हे यश प्राप्त केले आहे. मित्र परिवारचे मार्गदर्शन लाभले असून आई वडिल व भावाने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी चांगले पाठबळ दिल्याचे अक्षयने सांगितले आहे. या यशानंतरही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत राहणार असल्याचे सांगितले. अक्षय याच्या यशानंतर त्याचे कुटुंबीय व माढयातील मित्रपरिवाराने पेढे वाटून फटाके फोडुन आनंद साजरा केला. सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment