रानभाजी महोत्सवाला सोलापूरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 15, 2023

रानभाजी महोत्सवाला सोलापूरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद

 रानभाजी महोत्सवाला सोलापूरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद

*सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्याचे सेवन करावे - तहसीलदार किरण जमदाडे

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग यांच्या वतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित रान भाजी महोत्सवाचे उद्घाटन सोलापूर दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले. व नैसर्गिक रित्या उगवण होणाऱ्या व आरोग्यासाठी सुदृढ असलेल्या रानभाज्याचे सेवन जास्तीत जास्त नागरिकांनी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी रानभाजी महोत्सवाचे आयोजक प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापूर दत्तात्रय गावसाने, कृषि विभागातील कृषि उपसंचालक आत्माचे प्र. उपसंचालक तथा तालुका कृषि अधिकारी दक्षिण सोलापूरचे रामचंद्र माळी, तालुका कृषि अधिकारी उत्तर सोलापूर सौ. मनिषा मिसाळ, जिल्हा कृषि अधिकारी पी. के. वाघमोडे व कृषि विभागातील कर्मचारी, महिला शेतकरी गटातील शेतकरी, शेतकरी उत्पादन कंपनीतील शेतकरी रानभाज्या पिकविणारे 30 शेतकरी यांची उपस्थिती होती.

             रानभाजी ही नैसर्गिकरित्या उगवून येते त्यास कोणतेही रासायनिक किंवा औषधे न फवारता ती पावसाच्या पाण्यावर उगवून येते. रानभाज्यात विविध औषधी गुणधर्म असलेली व पौष्टीकता भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले रानभाज्याचा नागरिकांनी आपल्या आहात समावेश करुन शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवून निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा. रानभाज्या आपल्या घराजवळ व शेताच्या बांधावर उपलब्ध असतात. रानभाजी नैसर्गिक वाढल्याने त्यात पोषणद्रव्यामुळे सुपोषण होते, अशी माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले.

             नैसर्गिक उगवून आलेल्या व न पेरता, लागवड न करिता उपलब्ध होणारी व शेतक-यांना आर्थिक लाभ मिळवून देणारी रानभाजी यांची शहररातील नागरीकांना दैनंदिन कसे उपलब्ध करून देता येईल यांचे नियोजन करावे. रानभाज्यात अत्यंत औषधी गुणधर्म असल्याने यांची बाजारात मागणी आहे. पण  शहरातील लोकांना रानभाजी विषयी व औषधीगुणाची माहीती नसल्याने या भाजीकडे दुर्लक्ष होते. आज रानभाजी महोत्सवात विविध रानभाजी व त्यांचे औषधी गुणधर्म माहितीचे फलकाव्दारे दाखविल्याने नागरीकांना या माहितीचा मोठा फायदा होणार आहे. तसेच रानभाजी पिकाखालील क्षेत्र वाढवणे व काही भाज्यापासून मुल्यवर्धित पदार्थ तयार करुन विक्री शेतक-यांनी करावी असे आवाहन तहसीलदार जमदाडे यांनी केले.

              या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रानभाजी महोत्सवाचे आयोजक प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले. जिल्हयातील नैसर्गिक रानभाज्याच्या मार्केटिंगसाठी कृषी विभाग पुढे सरसावला आहे मुबलकरित्या  आढळणाऱ्या  नैसर्गिक रानभाज्यांची  शहरातील नागरिकांना माहिती व्हावी. तसेच त्याचे औषधी गुणर्धमाची ओळख होण्यासाठी रानभाजी महोत्सव 2023 चे आयोजन केले आहे. शेतक-यांना रानभाज्यातून आर्थिक लाभ मिळवून देऊन बळकटीकरण करण्याचे ध्येय कृषी विभागाने ठरवलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

            या रानभाजी महोत्सवात विविध रानभाजीचे 35 माहिती व औषधी गुणधर्म असलेली डिजीटल बोर्डव्दारे प्रदर्शित केले आहे. तसेच सोलापूर जिल्हयात आढळणा-या रानभाज्याची ओळख व पाककृती असलेली पुस्तकांचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

             या महोत्सवात शेतक-यांनी 22 प्रकारचे रानभाजी प्रदर्शित व विक्री करिता आणलेले होते. यात चिघळ, कडवंची, शेवग्याचेपाने, आंबडी, राजगीरा, अळू, पाथरी टाकळा, केना, हदगा, गुळवेळ, सराटा, पिंपळ, भुईआवळा, कपाळफोडी इत्यादी रानभाजी विक्रीस आणलेले होते.  नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल 16 हजार रुपयांची रान भाजी  नागरीकांनी खरेदी केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुजारी व शिवाजी येमूल यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages