साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची अनुदान व
बीज भांडवल योजना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा मार्फत मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग,दानखणी मांग,मांग महाशी,मदारी,राधेमांग,मांग गारुडी,मांग गोराडी,मादगी व मादिगा या जातीतील लोकांची आर्थिक उन्नती होण्यासाठी महामंडळामार्फत अनुदान व बीजभांडवल योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच. चव्हाण यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत 12 पोट जातीतील लोकांची आर्थिक उन्नती होण्यासाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येतात. बीजभांडवल योजने अंतर्गत प्रकल्प मर्यादा 7.00 लाख असून, यामध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के वरुन 45टक्के वाढ करण्यात आला आहे. तर बँकेचा सहभाग 75टक्केवरुन 50 टक्के पर्यंत कमी करण्यात आला आहे, लाभार्थींचा सहभाग 5 टक्के प्रमाणे आहे. या योजने अंतर्गत 10 हजार अनुदान रक्कम आहे.
जिल्हा कार्यालय सोलापूर मार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना या योजनांमध्ये कर्ज मागणी अर्ज वितरण करणे व अर्ज स्विकारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच थेट कर्ज योजने अंतर्गत कर्ज मागणी अर्ज वितरण व स्विकारण्याची कार्यवाही दिनांक 31 ऑगस्टपर्यंत सुरु राहील.
तरी इच्छुक मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग ,मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांगगोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजु व होतकरुनीं महामंडळाचे जिल्हा कार्यालय,2 रा माळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सात रस्ता,शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे,बीग बजार समोर, सोलापूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा असे, आवाहनही जिल्हा व्यवस्थापक आर.एच. चव्हाण यांनी केले आहे.,
No comments:
Post a Comment