अभियांत्रिकी शिक्षण घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्यासाठी सुवर्ण संधी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय (नॉर्थकोट प्रशाला) याचे केंद्र शाळेत रुपांतरण झाले असून सन 2022-2023 पासून इ.11 वी इ. 9 वी मध्ये मेकॅनिकल मेंन्टेनन्स व इलेक्ट्रिकल मेंन्टेंनन्स या विषयाकरीता संलग्न कनिष्ठ महाविद्यालय व शाळांमधून प्रवेश देण्यात येत आहेत. सदर सलग्नित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयाचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झालेली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी 11 वी शास्त्र (व्दिलक्षी) या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा असल्यास संलग्नित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात त्वरीत प्रवेश घेवून आपले उज्वल भविष्य साकारण्याची संधी घ्यावी.
बालभारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयप्लॉट क्र.2-11,3-9,4-10 नागेंद्र नगर, कुमठा नाका, सोलापूर (संपर्क क्र. 9175500786)छत्रपती शिवाजी प्रशाला, सोलापूर 101-ब, मुरारजी पेठ, या सलग्नित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयाचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
तांत्रिक शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याकरीता इच्छुक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी (शास्त्र) महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला (नॉर्थकोट) यांचेशी संलग्नता घ्यावी. जेणेकरून कौशल्याधारीत पिढी निर्माण होईल. नविन संलग्नता मिळविण्याकरीता (श्री बोनाकृती आर.एस8446166897 श्री अत्तार बी.डी.9028368535) संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment