*शहीद मोहन खटके यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही .मा.नागेश बापू खटके - पाटील*
*शहीद मोहन खटके यांच्या शिलालेखाचे उद्घाटन माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ...नागेश बापू खटके - पाटील यांच्या हस्ते करण्यात आले*
टेंभुर्णी (कटूसत्य वृत):- मेरी मिठी मेरा देश अभियाना अंतर्गत आज तांबवे गावामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे ग्रामपंचायत च्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
तांबवे गावचे सुपुत्र शहीद जवान मोहन खटके यांचा शिलालेख तयार करण्यात आला व शहीद मोहन खटके यांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले,ग्रामपंचायत ऑफिस समोर तिरंगा ध्वज फडकविन्यात आला .
कार्यक्रामाच्या अध्यक्ष म्हणून माझी सैनिक संजय थोरात होते तर तिरंगा ध्वज वंदन सरपंच सचिन कांबळे व उपसरपंच सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण कृषी सहाय्यक उबाळे व जयसिंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रतिनिधी मा नागेश बापू खटके- पाटील यांनी शहीद मोहन खटके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही असे सांगून आमच्या तांबवे गावचा सुपुत्र देशासाठी शहीद झाला हे आम्हा तांबवे करांचे भाग्य समजतो असे सांगून देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानाचा शिलालेख प्रत्येक गावात तयार करण्यात यावा हा उपक्रम खूपच कौतुकास्पद असल्याचे सांगितले
कार्यक्रमा साठी सरपंच सचिन कांबळे उपसरपंच सचिन पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नगाभाऊ खटके ,माझी सरपंच राजाभाऊ खटके,पोलिस पाटील जयसिंग पाटील,माझी सैनिक संजय थोरात ,शहीद मोहन खटके यांचे बंधू सावळाराम खटके, गणेश पाटील,महेश खटके, चंद्रकांत साठे ,दत्ता गोडसे,चांगदेव कांबळे,बुवा साठे,सुरेश कोळी ,अर्जुन गोडसे वैभव देशमुख संभा वायदंडे सर्व शिक्षक ,अंगणवाडी कर्मचारी व विद्यार्थी महिला ग्रामस्थ उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक राजेश माळी यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक तानाजी ढवळे गुरुजी यांनी मानले.

No comments:
Post a Comment